शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

क्रीडा विकासासाठी पावणेसात कोटी

By admin | Updated: June 20, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील विविध खेळांचा प्रचार-प्रसार व्हावा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्हा वार्षिक ....

नियोजन समिती : मागासवर्गीयांसाठी दोन कोटीयवतमाळ : जिल्ह्यातील विविध खेळांचा प्रचार-प्रसार व्हावा, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यासाठी पावणे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी व अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत अनुक्रमे २ कोटी ३४ लाख आणि १ कोटी ५५ लाख रुपये मिळणार आहे. रविवार १४ जूनला बचत भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी सहा कोटी ७६ लाख रुपयांच्या तरतूदीला मान्यता देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख रुपये जास्त मिळाले आहेत. सर्वाधिक चार कोटी ७६ लाख ५० हजार रुपये सर्वसाधारण योजनेसाठी आहे. यात युवक कल्याण कार्यक्रमासाठी ५.५० लाख रुपये, व्यायामशाळा सहाय्यक अनुदानासाठी एका कोटी ५० लाख, क्रीडांगण विकास अनुदान एक कोटी, समाजसेवा शिबिरासाठी २५ लाख तर क्रीडा केंद्र स्थापनेसाठी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत युवक कल्याण कार्यक्रम ८६.२१ लाख, व्यायामशाळा अनुदान एक कोटी १४ लाख, क्रीडांगण विकास २०.२७ लाख, स्वयंसेवी युवक मंडळासाठी १३.४८ लाख असे एकूण दोन कोटी ३४ लाख ७० हजार रुपये आदिवासीबहुल भागासाठी मिळणार आहे. अनुसूचित जाती उपयोजनासाठी एक कोटी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यात क्रीडांगण विकासासाठी ५० लाख रुपये, समाजसेवा शिबिर आयोजित करणे १५ लाख, युवक कल्याण मंडळ १५ लाख तर व्यायामशाळा विकासासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून दरवर्षी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यायामशाळा, ग्रामपंचायत क्रीडा विकासासाठी शासनाच्या विविध योजनेंतर्गत अनुदान देत असते. २०१५-१६ या वर्षासाठी पावणे सात कोटी रुपयांचा निधी वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. २०१४-१५ यावर्षी जिल्हा क्रीडा कार्यालयाने सहा कोटी ५१ लाख ५० हजार रुपयाचे निधी वाटप केले होते. (क्रीडा प्रतिनिधी)