शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:47 IST

राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील ८० लाख शेतकरी ओल्या आणि कोरड्या दुष्काळाच्या भीतीने सावध पवित्रा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. तर उर्वरित २० लाख शेतकरी पाच विभागांतील आहेत. ५३ लाख ४८ हजार हेक्टरवरील पीक संरक्षित झाले आहे. तर ९० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. त्यामुळे तेथील पीक रामभरोसे राहणार आहे.कोकण, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर २४ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या स्थितीत राज्यातील सर्वच विभागातील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.सर्वाधिक पीक विमा औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी उतरविला आहे. या ठिकाणी ४१ लाख ८ हजार ४१० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात सर्वाधिक शेतकरी बिड जिल्ह्यातील आहे. तेथील २० लाख ८३ हजार ८० शेकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. राज्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. लातूर विभागातील ३६ लाख ६१ हजार ३०३ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील ११ लाख शेतकऱ्यांनी, तर अमरावती विभागात १० लाख ४१ हजार ८३८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र यवतमाळ जिल्ह्याचे आहे. या ठिकाणी तीन लाख ५४ हजार ३५५ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.शेतकऱ्यांनी भरले ४४१ कोटीपीक विमा उतरविताना काही वाटा शेतकऱ्यांना भरायचा होता. राज्यातील एक कोटी सात लाख २४ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. ४४१ कोटी ८७ लाख २२ हजार ६८१ रूपये विमा कंपनीकडे वळते केले. यामुळे ५३ लाख ४८ हजार ९८६ हेक्टरवरील पीक संरक्षित झाले. १७ हजार ९९९ कोटी ७७ लाख नऊ हजार ९४० रूपयांच्या नुकसान भरपाईची हमी विमा कंपनीने उचलली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. यावर्षी त्यामध्ये वाढ नोंदविली गेली आहे. यावर्षीची स्थिती पाहता शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.- डॉ. अनिल बोंडे,कृषीमंत्री

टॅग्स :agricultureशेती