शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

मुर्धोणीत दगडाने ठेचून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:10 IST

तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देदाम्पत्य मध्य प्रदेशातील : आरोपी फरार, पोलिसांकडून जंगलात शोध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील मुर्धोणी येथे क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.सोनावती सूरज भवेदी (३०) असे मृत महिलेचे नाव असून सूरज गेंदा भवेदी (३५) असे आरोपीचे नाव आहे. हे दाम्पत्य मध्यप्रदेशातील चोबीसा (ता.शेरपुरा जि.डिंडोरी) येथील रहिवासी आहेत. सूरज हा त्याची पत्नी सोनावती हिला सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी कामाच्या शोधात वणी तालुक्यातील मुर्धोणी या गावात आला. त्याच्यासोबत इतरही काही लोक मजुरीसाठी मध्यप्रदेशातून आले होते. दोन महिन्यांपासून हे दाम्पत्य आवारी यांच्या बंड्यात राहत होते. सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. यावेळी सूरज दारूच्या नशेत होता. वाद इतका विकोपाला गेला की, सूरजने संतापाच्या भरात सोनावतीवर फरशी व दगडाने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी होऊन सोनावती जागीच मरण पावली.महाशिवरात्रीनिमित्त गावात भजन सुरू असल्याने गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळाली नाही. परंतु माहीती मिळताच गावातील पोलीस पाटलांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली.पोलीस श्वान पथकासह घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. याप्रकरणी दुर्गावती धुर्वे हिच्या तक्रारीवरून पती सूरज गेंदा भवेदी याच्याविरोधात भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.श्वानपथकही अर्ध्यातून परतलेपत्नीला ठार मारून आरोपी सूरज जंगलाकडे पळून गेला. पोलिसांनी रात्रभर जंगलात त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. मंगळवारी दिवसभरही पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु कोणताही मागमूस लागला नाही. श्वानपथकाने गावापर्यंतच्या नाल्यापर्यंत मार्ग दाखविला. तेथून ते परत आले. आरोपी हा परप्रांतीय असून त्याच्याकडे आधार कार्डही नाही. पळून जाताना त्याने स्वत:चा मोबाईल घटनास्थळीच टाकून दिला. त्याचे कोणतेही छायाचित्र त्याच्या कुटुंबाकडे नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना चांगल्याच अडचणी येत आहेत.

टॅग्स :Murderखून