शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी सापडला संकटात

By admin | Updated: February 11, 2015 00:13 IST

शेतकऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

यवतमाळ : शेतकऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या स्थितीसंदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथे आपल्या सरकारचा १०० दिवसांचा लेखाजोखा मांडत होते त्याचवेळी विदर्भात मात्र सहा दुष्काळग्रस्त शेतकरी सक्तीची कर्जवसुली, नापिकी तसेच कापूस, तुरी व धानाला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे यवतमाळ जिल्यातील शीरमाळ येथे ग्यानबा मोरे, राजुर येथे प्रमोद बल्की, चंद्रपूर जिल्यात हळदा येथे मुरलीधर चिमूरकर, गडचिरोली जिल्हयातील कमळगावचे धर्मा आभारे, अमरावती जिल्यातील माउली येथील सुनील गवई व वर्धा जिल्यातील उमरी येथील गोपाळ खंडाईत हे आत्महत्या करून जीवनयात्रा संपवीत होते, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. एकीकडे मुख्यमंत्री, अलीकडेच मी डावोस येथे भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जाऊन आलो. तेथे मी शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन उभारण्याबाबत काही महत्त्वाच्या कंपन्यांशी चर्चा केली. यानुसार दहा लाख शेतकऱ्यांचा काही परदेशी कंपन्याबरोबर थेट करार होईल. शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादने विकणाऱ्या कंपन्या १४ प्रकारची बियाणे शेतकऱ्यांना देतील व पुढल्या वर्षी २५ लाख शेतकऱ्यांशी असे करार करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण योजना मुंबईत सह्यान्द्री येथे पत्रकारांना सांगत होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना ‘शेतकरी वाचवा’ अशी विनंती करण्यासाठी शेतकरी नेते किशोर तिवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तिवारी यांनी यावेळी केळापूर तालुक्यातील दहेली तांडा येथील आजारी उपासमारीला तोंड देत असलेले शेतकरी वासुदेव चव्हाण पांढरकवडा येथील स्टेट बँकने सरकारी मदत पिककर्जात कपात केल्याची तर राळेगाव तालुक्यातील माजी सरपंच सुदाम बल्की ह्यांनी फायनान्स कंपनीने गुंड लाऊन सरकारी अधिकाऱ्यांसोबत कर्जवसुली संपूर्ण यवतमाळ जिल्यात सुरु केल्याची माहिती दिली. तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या यावर्षी एकूण ३९४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६० टक्के गावांमध्ये पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर असून यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले असल्याची माहिती देत केंद्र सरकारने आपली सुमारे ५ हजार रुपये कोटींची मदत देणे तर सोडा यावर साधी चर्चा करीत नसल्याच्या आरोप तिवारी यांनी केला. (प्रतिनिधी)