सीईओंना निवेदन : घरकुलासह विविध मागण्यायवतमाळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी अपंग कल्याण पुनर्वसन निधी वेळेत खर्च करावा, विनाअट घरकूल द्यावे यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. शासनाच्या निर्णयाप्रमाणे अपंगा कोणत्याच सोयी सवलती दिल्या जात नाही. शासनाच्या निर्देशांची पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीकडून पायमल्ली केली जाती. अपंगाना त्यांचा हक्काच्या योजनांचा लाभ द्याव या मागणीसाठी अपंगत जनता दलाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. ग्रामपंचातीमध्ये अपंगाची नोंद घेण्यात यावी, अपंगाना विनाअट घरकूलाचा लाभ द्यावा, विवाह योजनेचा निधी देण्यात यावा, बिज भांडवलासाठी त्वरीत कर्ज मंजूर करण्यात यावे, अपंगाना जिल्हा परिषदेने स्टॉलचे वाटप करावे यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चामध्ये अपंग जनता दलाच्या ज्योती देवकर, ज्ञानेश्वर कुळवे, लक्ष्मण गादेकर, प्रमोद राठोड, राजरतन थुल आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
अपंगांची जिल्हा परिषदेवर धडक
By admin | Updated: February 13, 2016 02:10 IST