शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या साडेसहा लाख फिंगर प्रिंट झाल्या डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 02:54 IST

ओळख सहज पटविता येणार

- सुरेंद्र राऊत यवतमाळ : गुन्ह्यांचा शोध लावण्यामध्ये घटनास्थळावर गुन्हेगाराचे मिळालेले बोटांचे ठसे महत्त्वाचा सुगावा मानला जातो. मात्र अनेकदा ठसे मिळूनही ते मॅच करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. आता संपूर्ण राज्यातील गुन्हेगाराचे फिंगर प्रिंट रेकॉर्ड डिजिटल होत आहेत. पहिल्या टप्प्यात सहा लाख ५० हजार फिंगर प्रिंट डिजिटल झाल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांची ओळख सहज पटविता येणार आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) संपूर्ण देशातील फिंगर प्रिंट ब्युरोवर नियंत्रण ठेवते. राज्यातील फिंगर प्रिंट रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी ‘आॅटोमॅटिक मल्टीमॉडेल बायोमेट्रिक अ‍ॅडेंटीटी’ (अ‍ॅबीश सिस्टीम) एका खासगी कंपनीने तयार केली आहे.प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हेगारांचे फिंगर प्रिट व डोळे (आयरिस) इतर बायोमॅट्रीक अ‍ॅडेंटीटी घेतली जाणार आहे. यासाठी राज्यातील एक हजार १६० पोलीस ठाण्यामध्ये मॉफी टॉप (मेसा अप्लीकेशन) वापरले जाणार आहे. गुन्हा नोंद झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे बायोमॅट्रिक रेकॉर्ड तयार होणार आहेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागणार नाही.शाई लावून ठसे घेणे हद्दपारपरंपरातगत पध्दतीत गुन्हेगाराच्या हाताला व पायाला शाई लावून त्याचे ठसे घेतले जात होते. एखादा गुन्ह्यात फिंगर प्रिंट मिळाल्या, तरी सर्वच रेकॉर्ड पडताळणी प्रत्यक्ष करावी लागत होती. एक व्यक्ती किमान १० ठसेसुध्दा दिवसभरात पडताळू शकत नव्हता. यामुळे गुन्हेगारांची ओळख पटविताना अनेक अडचणी पुढे येत होत्या. प्रत्यक्ष संपूर्ण रेकॉर्ड पडताळणी शक्यच होत नव्हती. आता ठसे तज्ज्ञांना पोर्टेबल अ‍ॅबीश देण्यात येणार आहे. थेट घटनास्थळावरच मिळालेल्या ठशांची पडताळणी करून गुन्हेगाराची ओळख पटविता येणार आहे. यामुळे पोलीस तपासाची गती निश्चितच वाढणार आहे. फिंगर प्रिंट विभागाचे काम आत चोवीस तास चालणार आहे.फिंगर प्रिटच्या डिजिटल रेकॉर्ड संदर्भात पुणे येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अ‍ॅबीश व मर्फी टॉप अप्लिकेशनमुळे कामाची गती वाढणार आहे.- शिवानंद बिचेवार, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, यवतमाळ.