शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:00 IST

महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे.

ठळक मुद्देएसपींचा आदेश बेदखल : महागावची गोपनीय शाखा कोलमडली

विवेक पांढरे ।आॅनलाईन लोकमतफुलसावंगी : महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे. या अवैध व्यवसायातून गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून महागाव ठाण्याची गोपनीय शाखा कोलमडल्याचे दिसत आहे.कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या आशेने अनेक तरुण या अवैध व्यवसायात गुंतले आहे. दारू, जुगार, मटका सर्वत्र उपलब्ध असल्याने तरुणांसोबतच अल्पवयीन मुलेही व्यसनांच्या आहारी जात आहे. अशा व्यवसायात गुरफटलेल्यांची तलब पूर्ण करण्यासाठी काही व्यसनाधीन तरुण चोºया आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे दिसत आहे. हा प्रकार महागाव तालुक्यातील प्रत्येक गावात घडत असताना महागावची गोपनीय शाखा मात्र कोलमडली आहे. जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून तालुक्यातून अनेक गुन्हेगारांना पकडले जाते. जे जिल्हास्तरावरील पथकांना कळते ते स्थानिक पोलिसांना कळू नये हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी क्राईम मिटींगमध्ये अवैध व्यवसायावर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. अशा व्यावसायिकांवर कठोर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु या आदेशाला स्थानिक ठाणेदारांकडून कोलदांडा दिला जातो. उलट अवैध व्यावसायिकांना अभय पुरविले जाते.महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या या अवैध व्यवसायाचा धसका अनेकांनी घेतला आहे. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकही चिंतेत आहे. पोलिसांनीच यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा गुन्हेगारीत वाढ निश्चितच होईल.पुन्हा उगवले अवैध व्यावसायिकमहागाव पोलीस ठाण्याचा कारभार दोन महिने १५ दिवस परिविक्षाधीन अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्याकडे होता. ते रुजू होताच सर्व अवैध व्यावसायिक भूमिगत झाले होते. परंतु आता नवीन ठाणेदार रुजू झाले आणि भूमिगत झालेल्या व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर भर चौकात आपले व्यवसाय थाटले आहे.