शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यांमुळे वाढतोय गुन्हेगारीचा आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 22:34 IST

अनेक शौकिनांनी कुंटणखान्यात पैसा उडविण्यासाठी चोरी करण्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. यातूनही शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता पोलीस वर्तुळातील काही ज्येष्ठांनी वर्तविली आहे. पिटाची कारवाई करताना उगाच बदनामी ओढविली जाते. त्यामुळे कुणीच अधिकारी ही कारवाई करण्यास धजावत नाही. बऱ्याचदा आर्थिक हितसंबंधच आडवे येत असल्याने शहरातील कुंटणखान्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

ठळक मुद्देचोरी, घरफोड्यांना बुस्ट : समस्येच्या मुळाकडे पोलिसांचे दुर्लक्ष, शहराच्या समाज स्वास्थ्याला धोका

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील गुन्हेगारीला अवैध देहविक्रीच्या व्यवसायातून बुस्ट मिळत आहे. सहा महिन्यापूर्वी कारागृहाबाहेर आलेले आरोपी पुन्हा त्याच पद्धतीने खुनाची घटना घडवितात यातून सर्वांनाच सतर्क राहणे गरजेचे आहे. कुंटणखान्यात होणारी आर्थिक उलाढाल ही शहराच्या समाज स्वास्थ्याला धोकादायक ठरणारी आहे. कुंटणखान्यात जाण्यासाठीच घरफोड्या, चोरी, मंगळसूत्र चोरी या सारखे गुन्हे घडत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतरही या कुंटणखान्याचा बंदोबस्त केला जात नाही.अनेक शौकिनांनी कुंटणखान्यात पैसा उडविण्यासाठी चोरी करण्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नाही. यातूनही शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता पोलीस वर्तुळातील काही ज्येष्ठांनी वर्तविली आहे. पिटाची कारवाई करताना उगाच बदनामी ओढविली जाते. त्यामुळे कुणीच अधिकारी ही कारवाई करण्यास धजावत नाही. बऱ्याचदा आर्थिक हितसंबंधच आडवे येत असल्याने शहरातील कुंटणखान्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वच आलबेल असल्याने अनेकांनी या व्यवसायात आपले प्रस्थ निर्माण केले आहे. गरीब, गरजू विविध प्रकारच्या अडचणीत असलेल्या महिला, मुलींचे शोषण या व्यवसायाच्या माध्यमातून होत आहे. त्यानंतरही ठोस बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. अनेक युवा महिला अधिकारी पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांनी अशा कुंटणखान्याचा पूर्णत: बीमोड करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही.अल्पवयीन मुले गांजा, दारू या व्यसनासोबतच कुंटणखान्यावरही नियमित जात आहेत. यातूनच दुचाकी चोरी, घरफोडी, दुकान फोडणे अशा घटना सातत्याने होत आहे. गुन्हे उघडकीस येत असले तरी गुन्हे घडण्यासाठी पोषक वातावरण शहरात तयार झाले आहे. हे वातावरण बदलविणे केवळ पोलिसांच्या हातात आहे.घरफोड्यांचाही सुगावा लागण्याची शक्यताशहरात दोन डझनावर कुंटणखाने राजरोसपणे सुरू आहे. येथे पैसा उडविणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठीतांसोबतच अल्पवयीन व युवकांचाही सहभाग आहे. या ठिकाणांवर पोलिसांनी वॉच ठेवल्यास गंभीर गुन्ह्यांचा छडा लागण्याची दाट शक्यता आहे. नियमित उठबस व पैसा खर्च करणाºयांवर फोकस ठेवण्याची गरज आहे.या संपूर्ण रॅकेटमध्ये शहरातील सक्रिय व नव्याने आलेल्या गुन्हेगारांचा माग लागू शकतो. या दृष्टीने पोलिसांनी आपला तपास करणे आवश्यक असल्याचे जाणकारांकडून सांगितलेजाते.मैदानांसह भररस्त्यावर लैला-मजनूंचा धुमाकूळशहरातील अनेक कॉलन्यांमध्ये खुली मैदाने आहेत. काही ठिकाणी विविध धार्मिक देवस्थान बांधले आहे. याचाच आडोसा घेऊन अनेक प्रेमीयुगुल एकांत शोधतात. त्यांचे नको ते चाळे सर्वांना उघड्या डोळ्याने पहावे लागते. कुणी हटकण्याचा प्रयत्न केल्यास थेट शस्त्राचा धाक दाखविला जातो. पुष्पकुंज सोसायटीत तर एका रोड रोमिओने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हटकणाऱ्या सुजान नागरिकालाच चोप दिला. याची तक्रार होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून कोण कधी कसा हल्ला करेल याचा नेम राहिला नाही. राजरोसपणे शस्त्र घेऊन फिरणाºयांवरही कारवाई होताना दिसत नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी