शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 21:16 IST

तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत फोडला मोबाईल.

विशाल सोनटक्के /  उमरखेड (यवतमाळ ) : नांदेड, उमरखेड मार्गावर मार्लेगाव येथील निवडणूक विभागाच्या वतीने उभारलेल्या तपासणी नाक्यावर वाहन थांबविले असता कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून त्याचा मोबाईल फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पुत्रासह समर्थकावर उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे स्वत:कडील एमएच-२६-बीएक्स-२९२९ या वाहनाने हदगाववरून उमरखेडकडे येत होते. रस्त्यात मार्लेगाव येथे निवडणूक विभागाच्या वतीने चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. येथे शासकीय कर्मचारी मारोतराव काकडे, प्रकाश पवार, अशोक सूर्य, राजरतन नवसागरे, तसेच पोलिस शिपाई संघर्षशील टेंभरे व गजानन आडे हे नाकाबंदीच्या कर्तव्यावर आहेत. यातीलच कर्मचाऱ्यांनी आष्टीकर यांना त्यांचे वाहन तपासणीसाठी थांबविण्यास सांगितले. या वेळी संतापलेल्या कृष्णा पाटील आष्टीकर यांनी पोलिस कर्मचारी संघर्षशील टेंभरे यांच्याकडील मोबाईल हिसकावून फोडला तसेच सहकारी कर्मचारी रामकिसन शिंदे यांच्या गळ्यातील ओळखपत्र हिसकावले. त्यानंतर तेथून ते पसार झाले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी रामकिसन शिंदे (४९) रा. गोकुळनगर उमरखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांच्या सहकार्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ