शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुसद जिल्हा निर्मितीचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 22:04 IST

येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देविकासात राजकारण नाही : आमदारद्वय मिर्झा, नाईक यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पुसद जिल्हा निर्मितीचा बिगुल वाजला. दोन्ही आमदारांनी पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.पुसद अर्बन बँकेतर्फे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य डॉ.वजाहत मिर्झा व अ‍ॅड.निलय नाईक यांचा साई मंगलम सभागृहात सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डॉ.एन.पी.हिराणी होते. प्रथम पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्याहस्ते डॉ.वजाहत मिर्झा व अ‍ॅड.निलय नाईक यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार डॉ.मिर्झा म्हणाले, विकास कार्यात कदापिही राजकारण आडवे येणार नाही. रखडलेल्या उपक्रमांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे पुसद जिल्हा निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आमदार अ‍ॅड. निलय नाईक म्हणाले, माझ्या राजकीय २५ वर्षांच्या प्रवासात मला एकही पद देण्यात आले नाही. आपल्यावर सतत अन्यायच झाला. आता कोणत्याही दबावाचा आपल्यावर परिणाम होणार नाही. पुसद जिल्ह्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून विकास कार्यासाठी राजकारण विरहित काम करण्याची ग्वाही त्यांनीही दिली.या कार्यक्रमाला माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार विजय खडसे, बँकेचे ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.आप्पाराव मैंद, तातू देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, वसंतराव पाटील, कान्हेकर, डॉ.अकील मेमन, प्रा.सुरेश गोफने, के.आय. मिर्झा, पंजाबराव देशमुख खडकेकर, विनोद जिल्हेवार, डॉ.मोहम्मद नदीम, अ‍ॅड.आशिष देशमुख यांच्यासह बँकेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते.पुसद अर्बन को-आॅप बँक परिवारातर्फे कुटुंबातील दोन सदस्यांचा हा सत्कार करण्यात आला. कुटुंबातील दोन सदस्य आपल्या कार्यकर्तृत्वाने आमदार झाल्याबद्दल त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे शरद मैंद यांनी सांगितले. संचालन मनीष अनंतवार यांनी केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी मानले.तरुणांची जीवलग मैत्री‘आपल्या भूमिपुत्रांचा व जिवलग मित्रांचा सत्कार’, असे नाव या कार्यक्रमाला देण्यात आले होते. त्यात शरद मैंद यांनी प्रास्ताविकातून जीवलग मित्रांचा सन्मान करण्याचे अहोभाग्य आपल्याला मिळाले, अशी भावना व्यक्त केली. याच कार्यक्रमातून आता पुसद जिलहा निर्मितीचा बिगुल वाजल्याने पुसद जिल्हा होण्याची शक्यता बळावली आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ