लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होण्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. यात दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून दोघांनाही पुसदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शेख अमीर शेख इसाक (२४) आणि शेख असरफ शे. इसाक (२६) असे गंभीर जखमी पुतण्यांंची नावे आहे. सवना येथील शेख कुटुंबियांचे वेगवेगळे व्यवसाय आहे. त्यात प्रमुख व्यवसाय किराणा भंडार असून येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असते. काही दिवसापूर्वी महागाव पोलिसांनी धाड मारुन गुटखा जप्त केला होता. त्यावरूनच हा वाद उद्भवला. गुरुवारी सकाळी काका शे. वकील शे. इस्माईल आणि त्यांची तीन मुले शेख फारुक शे. वकील, शे.रज्जाक शे. वकील आणि शे. राहील शे. वकील आणि पुतणे शे. अमीर व शे. इस्माईल यांच्यात वाद झाला.या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोनही पुतणे गंभीर जखमी झाले. तर काकासह चौघे जण पसार झाले. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:33 IST
गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत होण्याची घटना महागाव तालुक्यातील सवना येथे गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
गुटखा विक्रेत्या काका-पुतण्यात हाणामारी
ठळक मुद्देसवनाची घटना : दोन भाऊ गंभीर जखमी