शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील वडद येथे गोठ्याला लागली आग; ११ शेळ्या, ५० कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:21 IST

fire Yawatmal News महागाव तालुक्यातील वडद (मुडाणा) येथील नारायण भगाजी ठाकरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली.

ठळक मुद्देलाखोंचे साहित्य खाक ११ शेळ्या, ५० कोंबड्यांचा मृत्यू

 लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : महागाव तालुक्यातील वडद (मुडाणा) येथील नारायण भगाजी ठाकरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत लाखोंच्या साहित्यासह तब्बल ११ शेळ्या आणि ५० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील सर्व साहित्य खाक झाले. गोठ्यात बांधून असलेल्या ११ शेळ्या आणि ५० कोंबड्यांचाही होरपळल्याने तडफडून मृत्यू झाला. गोठ्यात ३० टीनपत्रे, मौल्यवान लाकडी साहित्य, तुषार सिंचन पाईप व इतर शेती अवजारे ठेवलेली होती. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.  गोठ्यात साठवून ठेवलेला दहा क्विंटल कापसाचीही राखरांगोळी झाली. विशेष म्हणजे गोठ्यात विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे कुणी तरी वैमनस्यातून ही आग लावली असावी असा कयास शेतकरी नारायण ठाकरे यांनी व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच गुरुवारी महसूल विभागाने घटनास्थळ गाठून नुकसानीचा पंचनामा केला. शेतकऱ्याचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :fireआग