शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी कोर्टाचा ग्रीन सिग्नल; दोन आठवड्यात यादी मागविली

By अविनाश साबापुरे | Updated: November 18, 2023 19:09 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आता माध्यमिक शिक्षक म्हणून बढती मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यवतमाळ: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना आता माध्यमिक शिक्षक म्हणून बढती मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी आदेश दिला असून एक डिसेंबरपूर्वी पदोन्नतीस पात्र शिक्षकांची ज्येष्ठता यादी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. इतर पदांप्रमाणे शिक्षकांना पदोन्नतीसाठी फारसा वाव नसतो. त्यातच प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या शाळेतच माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नतीचे मार्ग आजवर बंद होते. हा मार्ग मोकळा करून द्यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा या संघटनेने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले होते.

 यात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक पदोन्नतीकरिता सेवाजेष्ठता यादीत प्राथमिक शाळेतील बीएड अहर्ताधारक विषय शिक्षकांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी आदेश दिला. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मधील नियम ५०, खंड ४, परिशिष्ट ४ भाग २ नुसार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक हे माध्यमिक शिक्षक म्हणून पदोन्नतीस पात्र आहेत, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमानुसार सर्व पात्र शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी ३० नोव्हेंबरपर्यंत तयार करावी आणि १ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात ॲड. अमोल देशपांडे यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने युक्तीवाद केला. 

आता नजरा जिल्हा परिषदेच्या भूमिकेवरउच्च न्यायालयाने पदोन्नतीला हिरवा कंदिल दाखविला असला, तरी त्यासाठी जिल्हा परिषदेने सेवाज्येष्ठता यादी वेळेत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर, विकास दरणे, पुरुषोत्तम डवले, दत्ता ठाकरे, राजेश जुनघरे, डॉ. प्रीती स्थूल, मीना काळे, आशा पाखरे नागोराव ढेंगळे, संदीप ठाकरे, महेश पाल, श्रीराम वानखडे, राजकुमार महल्ले, सुहास लांबाडे, अर्जुन मोगरकर, रवींद्र कचरे, संजय भारती, वनमाला पाइकराव, गणेश राऊत, संजय बारी, कवडू जीवने यांनी सीईओ तसेच ईओंना निवेदन सादर केले. 

टॅग्स :YavatmalयवतमाळTeacherशिक्षक