शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणी मोजा... मचाणावर बसून घ्या जंगलाची मजा !

By अविनाश साबापुरे | Updated: April 29, 2023 18:20 IST

Yawatmal News जगात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील जंगलांमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. या गणनेच्या वेळी वन्यप्रेमींनाही जंगलाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.

अविनाश साबापुरे

यवतमाळ : जगात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील जंगलांमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. या गणनेच्या वेळी वन्यप्रेमींनाही जंगलाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी वनविभागाने ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम घोषित केला आहे. नागरिकांना पौर्णिमेच्या चांदण्यात तऱ्हेतऱ्हेचे प्राणी न्याहाळता यावेत, यासाठी मचाणेही उभारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या मचाणांचे ऑनलाइन बुकिंग करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मग काय? बुक करा तुमचे मचाण अन् चला वाघांच्या प्रदेशात..!

मेळघाट व्याघ्रप्रकल्पाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या अखत्यारीत विदर्भातील तब्बल सहा वन्यजीव विभाग येतात. त्यांतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पासह यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य, पैनगंगा अभयारण्य या ठिकाणी वाघांची मोठी संख्या आहे. त्यासोबतच चिखलदरा, सेमाडोह, सोमठाणा, शहानूर, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, लोणार, ज्ञानगंगा, आदी ठिकाणीही घनदाट जंगल आणि समृद्ध प्राणिविश्व आहे. या सर्वच ठिकाणी ५ मे रोजी पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. त्या दरम्यान, वन्यप्राणिप्रेमी नागरिकांनाही सहभागी होता येणार असून, त्यासाठी ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम घोषित करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी एकंदर १६५ मचाणांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांतील काही मचाणे व्हीआयपींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या मचाणांवर बसून वन्यप्राणी पाहायचे असतील तर ‘मॅजिकल मेळघाट डाॅट इन’ या संकेतस्थळावर नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे. प्राणिगणनेच्या निमित्ताने असेच उपक्रम महाराष्ट्रातील अन्य जंगलांमध्येही राबविले जाणार आहे.

अभयारण्यात येथे असतील मचाणे

- टिपेश्वर अभयारण्य :

सुन्ना जंगल सफारी गेट परिसरात १२ मचाणे असतील. त्यातील दोन मचाणे व्हीआयपींसाठी आरक्षित असतील. माथनी जंगल सफारी गेट परिसरात ६ मचाणे असतील. त्यातील १ व्हीआयपीसाठी राखीव असेल.

- पैनगंगा अभयारण्य :

खरबी वनविश्रामगृह परिसरात ५ मचाणे असतील. त्यातील एक व्हीआयपीसाठी राखीव असेल. कोरटा क्षेत्रातील चिखली विश्रामगृह परिसरातील सर्व आठ मचाणे वनप्रेमींसाठी उपलब्ध असतील. बीटरगाव क्षेत्रातील ७ आणि सोनदाभी क्षेत्रातील ५ मचाणेही वनप्रेमींसाठी असतील.

मेळघाट वन्यजीव विभाग

घाटांग ३, गाविलगड ३, जामली ३, अकोट ४, धुळघाट येथे २ मचाणे असतील. सीपना वन्यजीव विभागातील सेमाडोह येथे सर्वाधिक २५ मचाणे असतील; तर चिखलदरा १५, ढाकना १३, तारुबांदा येथे १० मचाणे असतील. अकोट वन्यजीव विभागात शिवपूर ३, शहानूर १२, नरनाळा येथे ९ मचाणे राहतील.

अकोला वन्यजीव विभाग

काटेपूर्णा बार्शीटाकळी ७, कारंजा सोहाेळ २, ज्ञानगंगा अभयारण्य १३ व लोणार अभयारण्यात १ मचाण असेल.

 

वन्यप्राणी पाहताना नियम मात्र पाळा

- एका मचाणावर वनविभागाचा एक प्रतिनिधी व एक निसर्गप्रेमी असे दोघेच असतील.

- मचाणावर बसल्यानंतर आपसांत बोलू नये. त्यामुळे वन्यप्राणी विचलित होतील.

- भडक किंवा अतिशुभ्र कपडे घालू नयेत.

- उग्र वास असलेले सुगंधित द्रव्य कपड्यांवर लावू नये.

- रात्री वन्यप्राणी पाहताना सर्चलाइट किंवा विजेरी वापरू नये.

- मचाणावर मद्यपान, धूम्रपान करू नये, पाॅलिथिन पिशवी टाळावी.

टॅग्स :wildlifeवन्यजीव