शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण परिषद; बंद शाळांना मिळालेल्या ४२ कोटींचा हिशेब ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:51 IST

ऐन शाळा बंद होण्याच्या तोंडावर राज्यातील शाळांना ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शाळा बंद असताना या पैशाचा विनियोग नेमका कोणी आणि कसा केला, याचा हिशेब आता मागण्यात आला आहे.

ठळक मुद्देयुवा आणि इको क्लब गठनाचे काय झाले?

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे मार्च महिन्यात शाळा बंद करण्यात आल्या. मात्र ऐन शाळा बंद होण्याच्या तोंडावर राज्यातील शाळांना ४२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. शाळा बंद असताना या पैशाचा विनियोग नेमका कोणी आणि कसा केला, याचा हिशेब आता मागण्यात आला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे.शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्ये वाढीस लागावी, यासाठी केंद्र शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत शाळांमध्ये युवा आणि इको क्लब स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. आश्चर्य म्हणजे, २०१९-२० या सत्रात हे क्लब स्थापन करण्याचे निर्देश चक्क फेब्रुवारीमध्ये म्हणजे सत्र संपण्याच्या महिनाभर आधी देण्यात आले. त्यातही या क्लबसाठी लागणारा निधी चक्क मार्चमध्ये शाळास्तरावर पोहोचला.यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांसाठी प्रत्येकी ५ हजार तर उच्च प्राथमिक शाळांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात आले. महाराष्ट्रातील २०६७१ उच्च प्राथमिक आणि ४४ हजार १३१ प्राथमिक शाळांसाठी ही तरतूद करण्यात आली होती. अशा प्रकारे ६४ हजार ८०२ शाळांसाठी ४२ कोटी ७३ लाख ६५ हजार रुपयांचा निधी शाळास्तरावर देण्यात आला. मात्र निधी मिळाला आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने शाळाच बंद झाल्या. लॉकडाऊनच्या काळातच शैक्षणिक सत्रही संपुष्टात आले. आता नव्या सत्राबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अशा काळात शाळांमध्ये युवा व इको क्लब स्थापन झाले असण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे क्लब स्थापनेसाठी आलेल्या निधीचा हिशेब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने घेणे सुरू केले आहे. त्याबरहुकूम यवतमाळ जिल्ह्यातही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडून उपयोगीता प्रमाणपत्र मागविले आहे. परंतु, शाळा बंद असताना क्लब कसा स्थापन करायचा आणि निधीचा हिशेब किंवा उपयोगीता प्रमाणपत्र कसे द्यायचे, हा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे निर्माण झाला आहे.शाळा सुरक्षा प्रतिज्ञेचाही हिशेब सांगायुवा क्लबप्रमाणेच राज्यातील सर्व शाळांना ‘शाळा सुरक्षा प्रतिज्ञा अनुदान म्हणून २५९ लाख रुपयांचा निधीही डिसेंबर-जानेवारीत देण्यात आला. या पैशातून ‘शाळा सुरक्षा प्रतिज्ञा’ लिहिलेला फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश होते. आज हा फलक दिसत नाही. शिवाय, शाळा सक्षमीकरण अनुदान म्हणून प्रती शाळा ७०० रुपये देण्यात आले होते. या सर्व निधीचा आता हिशेब मागविण्यात आला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र