शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम संपण्याच्या तोंडावर वणीत कापसाची भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:03 IST

कापूस हंगाम संपण्याच्या तोंडावर आता अचानक कापसाच्या भावात वाढ झाली आहे. वणीतील खासगी बाजार समितीत बुधवारी पाच हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कापूस हंगाम संपण्याच्या तोंडावर आता अचानक कापसाच्या भावात वाढ झाली आहे. वणीतील खासगी बाजार समितीत बुधवारी पाच हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.वणी कृषी बाजार समितीच्या शिंदोला केंद्रावरदेखील मंगळवारी पाच हजार ८५० रुपये प्रतीक्विंटल या भावाने कापूस खरेदी करण्यात आला. भारतीय बाजारपेठेत सरकी आणि कापूस गठाणीचा भाव अचानक वाढल्याने कापसाची भाववाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. १५ दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेत सरकीचे भाव प्रती क्विंटल दोन हजार ३०० रूपये होते, तर कापूस गठाणीचे भाव ४१ हजार ५०० रुपये होते. मात्र दोन दिवसांपूर्वी सरकीचे भाव दोन हजार ३०० वरून दोन हजार ८०० रुपयांवर गेले, तर कापूस गठाणीचे भाव ४४ हजारांवर गेले. यामुळे कापूस दरात वाढ झाली आहे.या हंगामात कापसाचा शासकीय हमीभाव चार हजार ४० रुपये होता. मात्र शासनाची अधिकृत खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयने विलंबाने खरेदी सुरू केली. परिणामी शेतकऱ्यांना सुरूवातीच्या काळात खासगी व्यापाऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी भावाने कापूस विकावा लागला. यंदा अल्पपाऊस व काही प्रमाणात बोंडअळीच्या उपद्रवाने कापसाच्या उत्पन्नात चांगलीच घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले. सुरूवातीच्या काळात शेतकऱ्यांनी आपली गरज भागविण्यासाठी मिळेल त्या भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकला. काहींनी भाव वाढेल, या आशेने बरेच दिवस कापूस घरात ठेवला. परंतु कापसाचे भाव वाढले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने जपून ठेवलेला कापूस व्यापाऱ्यांना विकला. आता अचानक कापसात भाववाढ झाली. जवळपास ९० टक्के कापूस व्यापाऱ्यांच्या घरात गेल्याने आता या भाववाढीचा फायदा थेट व्यापाऱ्यांनाच होणार आहे.चणा, तूर खरेदीचे अद्यापही आदेश नाहीतमार्च महिना संपत आला असला तरी अद्याप चणा आणि तूर खरेदीचे कोणतेही आदेश आले नसल्याने वणी खरेदी विक्री संघाकडून सांगण्यात आले. केवळ तूर व चणा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. ८०० पेक्षा अधिक तूर खरेदीदारांनी खरेदी विक्रीसंघाकडे नोंदणी केली, तर चणा खरेदीची नोंदणी बुधवारपासून सुरू झाली आहे. मात्र प्रत्यक्ष खरेदीसाठी अद्याप शासनाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत.

टॅग्स :cottonकापूस