शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसाचे दर खासगीच्या तुलनेत सीसीआयकडून अधिक, तरी सीसीआयकडे कल कमी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:45 IST

Yavatmal : कापूस विक्रीची गती मंदावली ; २५० रुपये खासगी व सीसीआयच्या दरात पडतो फरक

के. एस. वर्मा लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाववाढीच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. विविध आर्थिक गरजांमुळे काही शेतकरी आपला कापूस विक्रीकरिता आणत आहे. राळेगाव मुख्य बाजार, वाढोणा बाजार व खैरी या उपबाजारात दरवर्षीच्या तुलनेत कापसाची आवक जानेवारी महिना सुरू झाला असला तरी कमीच आहे. 

दुष्काळी स्थितीत अल्प उत्पादनाचासुद्धा हा परिणाम आहे. खुल्या बाजारात खासगीत कापूस खरेदीचे दर ७००० ते ७२०० रुपयांच्या आसपास दिला जात आहे. या दिवसात अपवाद वगळता आता बहुतांश शेतकऱ्यांचा कापसाच्या मोजणीत ओलावा आठ टक्के येत असल्याने अशा कापसाला सीसीआयकडून ७४२१ रुपये दर दिला जात आहे.

खासगी व सीसीआयच्या दरात २०० ते २५० रुपये प्रतिक्विंटल इतका मोठा फरक पडत असतानाही अनेक शेतकरी सीसीआयला टाळून खासगीत आपला कापूस विकत आहे. एका वाहनात सरासरी ३० क्विंटल कापूस आणला जातो. यात शेतकऱ्यांना सहा ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंतचा फटका बसत आहे. तरी अनेक शेतकरी सीसीआयऐवजी खासगीत कापूस विकतात. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणविल्या जाणाऱ्या नेत्यांनी, संस्थांनी व संघटनांनी याचे कारण शोधण्याची गरज आहे. सीसीआयकडे नोंदणीसाठी कागदपत्रे लागतात. आठ दिवसांत चुकारे मिळतात. 

पाच लाख क्विंटल खरेदी खासगीत तीन लाख चाळीस हजार क्विंटल तर, सीसीआयची एक लाख साठ हजार क्विंटल याप्रमाणे आतापर्यंत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी राळेगाव तालुक्यातील तीन केंद्रावर झालेली आहे. खासगीत दररोज सहा हजार तर, सीसीआयकडून दररोज अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे.

शेतकऱ्यांना रोख हवी शेतकऱ्यांना कापूस विकल्याबरोबरच नगदी पैसे हवे असतात. त्याकरता वेळप्रसंगी एक, दीड, दोन टक्के पैसे कपात करून देण्यासही ते तयार होतात. कापूस विक्रीतील पैसे घरी आणून दुसऱ्या दिवशी ते बँकेत भरतात. यात मोठ्या रकमेची ने-आण करण्याची जोखीमही त्यांच्याकडून घेतली जाते.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ