शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कापूसही रुसला; सोयाबीनला मिळतोय हमीपेक्षा कमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:52 IST

शेतकऱ्याची चिंता वाढली : कापूस लागवडीचा खर्चही निघेना

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूससोयाबीन सध्या चांगले भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, कापूससोयाबीनचा भाव वाढत आहे ही केवळ चर्चाच आहे. सोयाबीनला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.

पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापूस उत्पादन घेतले जाते. ही संख्या मोठी असली, तरी यंदाच्या वर्षात पूर व खराब वातावरणामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळाले नाही. शिवाय कमी उत्पादन असताना भाव देखील ३ हजार हजार ३०० पासून ४ हजार २०० पर्यंत एवढा कमी प्रति क्विंटलला मिळत आहे. मागील दसरा, दिवाळी सणापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे पुसद बाजार समितीचे आवारामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांच्या आडतीसमोर सोयाबीनचे ढीग दिसून येत आहेत. एकंदरच बाजारभाव हा ४ हजार २०० ते ३०० च्या वर जायला तयार नाही, तर आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तसेच ठेवले आहे. दुसरीकडे सोयाबीनवर शेतकऱ्यांनी अगोदरच उचल घेतलेली राहते, त्या उचलीची परतफेड करणे व नवीन ताळेबंद बसविणे यामध्ये बळीराजा गुंतलेला दिसतो. परंतु यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुसद तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे बाजारातील दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी गत झाल्यामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला देखील उतारा कमी आला. त्यातच कापसालाही खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. मागील काही वर्षात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात हजार इतक्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही. शिवाय वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून प्रति किलो १२ रुपये वेचणीला खर्च येत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

आता अपेक्षा तुरीच्या पिकाकडून सध्या तुरीचे पीक जोमात बहरलेले आहे. तुरीच्या पिकातून तरी हाती काही पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. याचा फटका बहरुन आलेल्या तुरीच्या पिकाला बसू नये अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीन