लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांनी मानवाच्या सर्व समस्यांवर शिक्षण हाच उपाय सांगितला आणि त्यासाठी अविरत प्रयत्न केले. अज्ञानातूनच समस्यांचा उदय होतो. ज्ञानाचा प्रकाशच मानवी जीवनाचा विकास करू शकतो, यावर ते ठाम होते. आज ज्ञानाऐवजी पदवी आणि पर्यायाने नोकरी यासाठीच आम्ही शिक्षण घेत आहोत. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास हे सूत्र आम्ही विसरलो. केवळ जास्त मार्क मिळविणे म्हणजे हुशारी ही चुकीची गोष्ट आम्ही स्वीकारली आहे. जपानने शैक्षणिक धोरणांची कडेकोट अंमलबजावणी केली. परिणामस्वरूप आज जापान आमच्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगतिपथावर आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंनिसचे वक्ते दिलीप सोळंके यांनी केले.‘शिक्षणाचा अर्थ, अनर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावर स्मृती पर्वात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंनिसचे सल्लागार प्रा. काशीनाथ लाहोरे होते. याशिवाय संत कबीर विचारपीठावर डॉ. विजय कावलकर, संतोष अरसोड, मृणाल बिहाडे उपस्थित होते.सोळंके पुढे म्हणाले, ‘भारत १३० कोटींचा देश असून ऑलिम्पिकमध्ये अतिशय सुमार कामगिरी करतो. अनेक लहान देश सुवर्ण पदके घेऊन जातात, तरी आम्हाला त्याची खंत वाटत नाही. शिक्षणाने ज्ञानी व्हावे ही इंग्रजांची इच्छा नव्हती, तर त्यांना त्यांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी कारकुनांची गरज होती. त्यादृष्टीनेच त्यांनी शिक्षणाची नीती आखली होती. समग्र क्रांतीसाठी सामाजिक प्रबोधन महत्त्वाचे असते. आपल्याकडे ते झाले नाही, म्हणून लोकशाही मूल्य पायदळी तुडविली जातात. महापुरुषांचे पुतळे उभारणे आणि त्यांचा कोरडा उदो-उदो करणे हीच आम्हाला जनसेवा वाटते. माणसाने तत्वपूजक असेल पाहिजे हे आम्ही विसरलो आणि नको तितके व्यक्तीपूजक झालो. परिणामी सर्व बाजूंनी आमची पिछेहाट झाली आहे. अंनिसचे संघटक बंडू बोरकर यांनी संचालन, विनोद डवले यांनी आभार मानले. विलास काळे, शशीकांत फेंडर, मृणाल डगवार, उमेश इंगोले, पुंडलिक रेकलवार, सेजल फेंडर, नीलेश शिंदे, विष्णूपंत भितकर, राहुल सारवे, सचिन साखरकर, श्रद्धा चौधरी, माधुरी फेंडर यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.सप्तखंजिरी व प्रबोधनपर कार्यक्रमस्मृती पर्वात व्याख्यात्यांच्या भाषणापूर्वी आकाश टाले आणि संच नागपूर यांचा सप्तखंजिरी व प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. सत्यपाल महाराजांच्या या शिष्याने विनोदी शैलीतून उत्तम प्रबोधन केले. यासाठी विविध विषय हाताळण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिक्षणमूल्य ऱ्हासानेच समस्या निर्माण झाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST
‘भारत १३० कोटींचा देश असून ऑलिम्पिकमध्ये अतिशय सुमार कामगिरी करतो. अनेक लहान देश सुवर्ण पदके घेऊन जातात, तरी आम्हाला त्याची खंत वाटत नाही. शिक्षणाने ज्ञानी व्हावे ही इंग्रजांची इच्छा नव्हती, तर त्यांना त्यांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी कारकुनांची गरज होती. त्यादृष्टीनेच त्यांनी शिक्षणाची नीती आखली होती. समग्र क्रांतीसाठी सामाजिक प्रबोधन महत्त्वाचे असते.
शिक्षणमूल्य ऱ्हासानेच समस्या निर्माण झाल्या
ठळक मुद्देसंडे अँकर । दिलीप सोळंके यांचे प्रतिपादन, यवतमाळ येथे स्मृती पर्वात अंनिसतर्फे व्याख्यान