शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Yawatmal; यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 19:43 IST

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची संख्या 3368 वर पोहचली.

ठळक मुद्दे24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 521 ने जास्त710 पॉझेटिव्ह, 1231 कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क     

यवतमाळ: जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मे रोजी 1010 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 11 मे रोजी 1127 तर बुधवार दि. 12 मे रोजी 1231 जण कोरोनामुक्त झाल्याने गत तीन दिवसांत बरे होणा-यांची संख्या 3368 वर पोहचली. तर गत तीन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या 2301 आहे. वरील तीनही दिवसांत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 1067 ने जास्त आहे.  गत 24 तासात जिल्ह्यात 710 जण पॉझेटिव्ह आले असून 1231 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह जिल्ह्यात एकूण 27 मृत्युची नोंद झाली. यात दोन नांदेड येथील, दोन वाशिम येथील तर एक मृत्यु चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 8079 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 710 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7369 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2511 तर गृह विलगीकरणात 3653 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65138 झाली आहे. 24 तासात 1231 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 57405 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1569 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.02, मृत्युदर 2.41 आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या