शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Yawatmal ; कोरोना चाचणी निगेटीव्ह असेल तरच बँकेत या... ; पांढरकवडा स्टेट बॅकेचा फतवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:51 IST

Yawatmal news कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवा व नंतरच बँकेत प्रवेश देणार असल्याचा फतवा सोमवारी येथील स्टेट बँकेने काढल्यामुळे कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी बँकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. 

ठळक मुद्दे  कामकाजासाठी आलेल्या ग्राहकांना मनस्ताप

 लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कोरोनाची चाचणी करून निगेटिव्ह असल्याचा अहवाल दाखवा व नंतरच बँकेत प्रवेश देणार असल्याचा फतवा सोमवारी येथील स्टेट बँकेने काढल्यामुळे कामकाजासाठी आलेल्या खातेदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी बँकेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. 

येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये शेतकरी, शेतमजुरांपासून तर कर्मचारी या सर्वांचेच खाते आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी खातेदार बँकेत येतात. त्यांना यवतमाळ, नागपूर येथील दवाखान्यात पैसे ट्रान्सफर करावी लागते. सोमवारीसुद्धा असे बरेचसे खातेदार बँकेत आले. परंतु, त्यांना बँकेच्या गेटवरच बँकेत जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

पं.स.चे माजी सभापती रीतेश परचाके हेसुद्धा बँकेत गेले होते. त्यांनाही कोरोना निगेटिव्हचा अहवाल नसल्याने परत पाठविले. परचाके यांनी तीन दिवसांपूर्वीच टेस्ट केली. परंतु, त्याचा रिपोर्ट यायचा आहे, असे सांगितल्यावरही रिपोर्ट आल्यानंतरच येण्याचे सांगितले. विशेष म्हणजे, कोरोना टेस्ट केली नसतानाही दारू विक्रेते, पेट्रोल पंपचालक यांना मात्र बँकेत प्रवेश दिल्या गेला. 

 बँकेत खातेदारांची मोठी गर्दी होत असून, संसर्गाची भीती आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसारच आम्ही कोरोना चाचणी अहवाल मागत आहोत. - अमोल रेवडकर, शाखा व्यवस्थापक