शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:17 IST

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे.

यवतमाळ: आज जिल्ह्यात 16 नवीन कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन जण ॲन्टीजन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 11 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तृप्तीनगर येथील एक पुरूष आणि समनानी नगर वडगाव येथील एक पुरुष तसेच तायडे नगर येथील एक महिला असे तीन जण आहेत, दिग्रस शहरातील शंकर नगर येथील एक पुरूष, काझीपुरा येथील चार पुरुष व तीन महिला असे आठ जण आणि दारव्हा येथील दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण आहेत. तसेच ॲन्टीजन चाचणीद्वारे वणी येथील एक आणि भोपाळ येथून एक पॉझेटिव्ह पांढरकवडा येथे स्थलांतरीत झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.  

जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 101 आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 197 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 16 पॉझेटिव्ह आणि 181 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 120 जण भरती आहे.  

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 397 वर गेला आहे. यापैकी 283 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 139 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6764 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6471 प्राप्त तर 293 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6076 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

जिल्हाधिका-यांचे आवाहन :

पावसाळ्याच्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन व्हायरल इन्फक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. वय वर्ष 10 पेक्षा कमी व 60 पेक्षा अधिक असणाऱ्यांनी तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह सारखे आजार असणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. नागरिकांना मागील 5 महिन्यांपासून मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सुचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. त्याचे पालन न करणे ही बाब धोकादायक ठरू शकते.

यापुर्वी यवतमाळ शहर पूर्णत: कोरोनामुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्हा देखील कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती, दुकानात 5 पेक्षी कमी नागरिकांना प्रवेश, मास्कचा वापर या शासनाच्या नियमांचे पालन करावे व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस