लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत असला तरी प्रामुख्याने वयोवृद्धांना अधिक धोका आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल नऊ वृद्धांचा कोरोनाने बळी घेतला. यात एकट्या यवतमाळ शहरातील चौघांचा समावेश आहे. तर वणीतील दोघे आणि पुसद, राळेगाव, कळंबमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी जिल्ह्याच्या विविध भागातील २२१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या २२१ रुग्णांमध्ये १३७ पुरुष व ८४ महिला आहेत. त्यात यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटंजीमध्ये सात, कळंब शहरात दहा, आर्णी तालुक्यात २२, उमरखेडमध्ये सात, तर मारेगाव शहरात सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर सात हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर २०९ जणांचा बळी गेला. आतापर्यंत पाच हजार ८३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ६३९ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. ४७८ जण होम आयसोलेशनमध्ये आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २८५ रुग्ण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने मार्चपासून एकंदर ६७ हजार ५१४ स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ६६ हजार १११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ५८ हजार ९५५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिवाय १४०३ अहवालांची अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाला प्रतीक्षा आहे.८३० जण कोरोनामुक्तजिल्ह्यात कोरोनाची साखळी वाढत चालली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमधून ८३० जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत तब्बल पाच हजार ८३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
थकत्या वयात कोरोनाचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST
यवतमाळ शहरातील ४६ पुरुष व ३० महिला तसेच ग्रामीण भागातील चार पुरुषांचा समावेश आहे. यासह दारव्हा १५, वणी तालुक्यात सहा, महागावमध्ये ११, पांढरकवडात तीन, दिग्रस तालुक्यात २०, बाभूळगाव तालुक्यात दोन, नेर तालुका आठ, राळेगावमध्ये एक, पुसद तालुक्यात २३, घाटंजीमध्ये सात, कळंब शहरात दहा, आर्णी तालुक्यात २२, उमरखेडमध्ये सात, तर मारेगाव शहरात सहा जणांचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला.
थकत्या वयात कोरोनाचा वार
ठळक मुद्देदिवसभरात नऊ वृद्धांचा बळी : जिल्ह्यात २२१ नवे पॉझिटिव्ह