शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाचा कहर कायम, आणखी चौघांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या १५२ कोरोना बाधितांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे६४ नवे रुग्ण : यवतमाळच्या दोघांसह दिग्रसमधील महिलेचा मृतांमध्ये समावेश, एकूण रुग्णसंख्या दहा हजारांजवळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मध्यंतरी थंडावलेला कोरोनाचा कहर पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. गुरुवारी जिल्ह्यात कोरोना विषाणूने आणखी चार जणांचे बळी घेतले. तर ६४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या अगदी जवळ पोहोचला आहे.गुरुवारी दगावलेल्या चौघांपैकी यवतमाळ शहरातील ६५ आणि ५० वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ७० वर्षीय महिला आणि अन्य एका ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या १५२ कोरोना बाधितांचा समावेश आहे.जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत तब्बल ३१८ नागरिकांचा कोरोनाने बळी गेला. तर नऊ हजार ७५६ कोरोना संक्रमितांची नोंद करण्यात आली. त्यापैकी आठ हजार ६७९ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. वैद्यकीय प्रशासनाने आजपर्यंत ८७ हजार ३२२ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यातील ८६ हजार ६८१ अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी ७६ हजार ९२५ नागरिकांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले. तर ६४१ अहवालांची अद्याप प्रतीक्षा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले.सध्या सण-उत्सवाच्या काळात बाजारात चहलपहल वाढली आहे. प्रशासनानेही दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र बाहेर फिरताना नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.४३ जणांनी केली कोरोनावर मातवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वार्ड तसेच जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या तब्बल ४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या ४३ रुग्णांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता आठ हजार ६७९ झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या