शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Yawatmal; यवतमाळात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह; सात परप्रांतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 19:49 IST

कोरोना संशयितांचे यवतमाळात बुधवारी एकापाठोपाठ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे५१ जणांचे अहवाल प्राप्त, ४३ निगेटीव्हएकच स्थानिक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संशयितांचे बुधवारी एकापाठोपाठ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या आठ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एकच जण स्थानिक नागरिक असून उर्वरित सात जण रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय आहेत. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ही बाब स्पष्ट केली.यवतमाळातून आतापर्यंत ६५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्यापैकी ५१ अहवाल प्राप्त झाले असून १४ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. ५१ पैकी ४३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यापैकी स्थानिक नागरिक असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाचे वय ६० वषार्पेक्षा अधिक आहे. इतर सात जण परप्रांतीय आहेत. ते २५ मार्चपासून भोसा रोडवरील एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने वास्तव्याला होते. त्यामध्ये चार उत्तरप्रदेशातील, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. त्यांचे वय १५ ते ४५ वर्षे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाच्या संशयावरून नागरिकांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला २९ जणांचे नमुने नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. परंतु तेथील लॅब बंद पडल्याने हे नमुने पुण्याच्या नॅशन इन्टिट्युट आॅफ व्हायरॉलॉजीकलकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यातील सात जण पॉझिटीव्ह निघाले. तर १४ जणांचे नुमने नागपूरच्या एम्सकडे पाठविण्यात आले होते. त्यातील १३ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. एक अप्राप्त आहे. प्राप्त पैकी एक पॉझिटीव्ह तर १२ निगेटीव्ह आहे.कळंब चौक परिसर सील करणारएकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांचे वास्तव्य असलेला भोसा ते कळंब चौक हे क्षेत्र सील केले जाणार असून घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. या परिसराचे निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे.संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपॉझिटीव्ह रुग्ण आढळताच यवतमाळ शहर व जिल्ह्यात पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी आणखी कठोर केली आहे. कोणत्याही कारणांशिवाय फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहे.पहिल्या तिघांची प्रकृती ठणठणीतयवतमाळात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारानंतर ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस