शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ११७ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी होम आयसोलेशनमध्ये ३१५ जण आहे. वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्यांची संख्या ९६६ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देयवतमाळात ४९ : वणी २३, दिग्रस १३, नेरमध्ये नऊ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर ११७ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आयसोलेशन वार्ड व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ७३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सर्वाधिक ४९ रुग्ण यवतमाळ शहर व तालुक्यात आढळले आहे. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये आर्णी, पांढरकवडा, दिग्रस येथील व्यक्तींचा समावेश आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये वणी २३, दिग्रस १३, नेर नऊ, घाटंजी ६, पुसद ३, आर्णी ४, उमरखेड २, पांढरकवडा २, कळंब २, महागाव २, दारव्हा एक येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार २८१ वर पोहोचली आहे. यापैकी होम आयसोलेशनमध्ये ३१५ जण आहे. वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्ह्यातील इतर कोविड सेंटरवर उपचार घेत असलेल्यांची संख्या ९६६ इतकी झाली आहे. आता जिल्ह्यात चार हजार ४६४ इतके एकूण पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहे. यापैकी तीन हजार २५५ जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात २८४ जण उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी १३५ नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत ५७ हजार ८३३ नमुने तपासणीला पाठविले आहे. यातील ५४ हजार ५१२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर तीन हजार ३२१ नमुन्यांचा अहवाल अजूनही कोरोना प्रयोगशाळेत प्रलंबित आहे. वेळेत अहवाल येत नसल्याने कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना सपशेल फोल ठरत आहे. आतापर्यंत ४९ हजार ८४८ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तपासणीची गती वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र अजूनही अपेक्षित गती मिळाली नाही.कोरोना वेगाने का पसरतो ?लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक जण बिधास्तपणे फिरत आहे. हे तर माझे सहकारी आहेत, ईथे मास्कची काय आवश्यकता आहे, हे तर माझे जवळचे मित्र आहे, जवळचे नातेवाईक आहेत असे म्हणून प्रत्येक जण विना मास्क फिरत आहे, यातून कोरोना पसरत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या