शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

कोरोनाने दिवसभरात महिलेसह तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

सोमवारी मृत्यू झालेल्या या तीनही रुग्णांमध्ये सारीचीही लक्षणे आढळली होती. पुसद येथील मृतक १३ जूनपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर दारव्हा येथील मृतांपैकी पुरुष सोमवारी सकाळी यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देबळींची संख्या सात : दारव्हा दोन तर पुसदच्या एकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाग्रस्तांचा ‘रिकव्हरी रेट’ उत्तम राखणाऱ्या जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची मृत्यूसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात पुसद शहरातील ६० वर्षीय इसमासह दारव्हा शहरातील ६६ वर्षीय महिला व ४५ वर्षीय अन्य एका पुरुषाचा समावेश आहे.सोमवारी मृत्यू झालेल्या या तीनही रुग्णांमध्ये सारीचीही लक्षणे आढळली होती. पुसद येथील मृतक १३ जूनपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होता. मात्र सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर दारव्हा येथील मृतांपैकी पुरुष सोमवारी सकाळी यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल झाला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तर महिला यवतमाळकडे येत असताना वाटेतच दगावली. मृत्यूनंतर झालेल्या स्वॅब तपासणीत या दोघांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दीडशेच्या पार जाऊनही एकाही रुग्णाचा मृत्यू ओढवणार नाही याची प्रशासनाने पुरेपूर काळजी घेतली होती. गेल्या साडेतीन महिन्यात हे यश कायम होते. मात्र मागील पंधरवाड्यापासून रुग्ण संख्येसोबतच मृत्यू संख्याही वाढत आहे. १५ दिवसात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल सात जणांचा बळी घेतला. नेर येथील इसमाचा दोन आठवड्यापूर्वी बळी गेला. तेव्हा कोरोना विषाणूने ग्रामीण भागात पाय पसरल्याचे स्पष्ट झाले. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील मुडाणा-साधूनगर येथीलही इसमाचा मृत्यू झाला. या दोन मृत्यूमुळे जिल्हा प्रशासनाने तालुका पातळीवरील उपाययोजना अधिक कडक केल्या. नाशिकमधून नेरमध्ये खताचा ट्रक घेऊन आलेला चालकही कोरोनामुळे नेरमध्येच दगावला. त्या पाठोपाठ तीन दिवसांपूर्वी नेरमधीलच ८३ वर्षीय वृद्धाचा मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात मृत्यू झाला. आता प्रशासनाने नेर, पुसद, दारव्हा, महागाव आदी ठिकाणी कडक उपाय हाती घेतले आहे. मात्र राज्याच्या रेड झोनमधून जिल्ह्यात मजुरांचे ‘ईनकमिंग’ सुरू झाल्याने कोरोनाचे संक्रमणही वाढतच राहिले. त्यातूनच पुसद आणि दारव्हा सारख्या तालुकास्थळावरही कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावातून आलेल्या नागरिकांनी स्थानिकांच्या संपर्कात येऊ नये, नागरिकांनी अनावश्यकपणे बाहेर पडून गर्दी करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.दारव्हा शहरात आजपासून जनता कर्फ्यूकोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सोमवार १५ जूनपासून नेर नगरपरिषद क्षेत्रात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. तर दारव्हा शहरातही बाधितांची संख्या वाढत असल्याने मंगळवार १६ जूनपासून जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही शहरातील कोरोनाचा उद्रेक असलेला परिसर सील करण्यात आला आहे.दोघे कोरोनामुक्तवसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात भरती असलेले आणखी दोघे कोरोनामुक्त झाले. हे दोघेही नागापूर ता. उमरखेड येथील रहिवासी आहेत. त्यामुळे सोमवारी मेडिकल प्रशासनाने त्यांना रुग्णालयातून सुटी दिली. सध्या ३० अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह ३९ जण आयसोलेशन वार्डात भरती आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८६ रुग्ण आढळले. त्यातील १४८ जण बरे झाले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या