शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

कोरोना डेथ ऑडिट; 74 टक्के रूग्णांना आधीपासूनच आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देउशिरा दाखल झाल्याने कोरोना हावी : दुसऱ्या लाटेने केली हानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दहशत आजही कायम आहे. अनेकांना या काळात आपला जीव गमवावा लागला. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही पुरुषांचा समावेश सर्वाधिक आहे. किडनी, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हिपाटायटिस बी यासह इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या संसर्गाने दुसऱ्या लाटेत १०१६ पैकी ६६७ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर ६५.६४ टक्के इतका आहे, तर ३४९ महिलांचा मृत्यू झाला असून तो दर ३४.३५ टक्के आहे. यावरून महिला घरात राहात असल्याने त्या सुरक्षित असून त्यांचा मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून येते. पहिल्या लाटेत दहा महिन्यांत २६२५ रुग्ण आढळले होते. त्यात केवळ ३६३ जणांचाच मृत्यू झाला. दुसरी लाट ही पाच महिनेच होती. या काळात ५८७२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १०१६ जणांचा मृत्यू झाला. ही स्थिती अतिशय धोकादायक होती. या काळात रुग्णांना बेड मिळणेही मुश्कील झाले होते. शासकीयच नव्हे खासगी आरोग्य यंत्रणाही कोलमडली होती. हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे.

७३ जणांचा ४८ तासांत मृत्यूकोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण होते. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांचे अवलोकन केल्यास ही लाट किती घातक होती हे दिसून येते. एकूण एक हजार १६ जणांचा दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. यामध्ये रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जवळपास ७३ जणांचा रुग्णालयात दाखल होताच मृत्यू झाला. त्यांना बेड न मिळाल्याने प्रकृती खालावत गेली.

सर्वात जास्त रक्तदाबाचे रुग्णकोरोना हा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना सहज ग्रासतो. हे शासकीय कोविड रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रक्तदाब हा कोरोना वाढविण्याला पूरक ठरणारा आहे.मधुमेह यामुळेसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. मृत्यूमध्ये ९२ जणांना मधुमेह असल्यानेच कोरोना संसर्ग वाढून त्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही आजार असलेल्या ११७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशा रुग्णांवर कोरोना उपचारात लवकर प्रतिसाद मिळत नाही. धोका वाढत राहतो.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू