शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानभाषेच्या जागरासाठी संमेलनाची वारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:14 IST

मराठी शाळा आणि मराठी भाषा याचा व्यावहारिक पद्धतीने वापर व्हावा या विचाराने ज्ञानभाषा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष काम करत आहे.

स्नेहा मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : मराठी शाळा आणि मराठी भाषा याचा व्यावहारिक पद्धतीने वापर व्हावा या विचाराने ज्ञानभाषा प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष काम करत आहे. पहिल्यांदाच ज्ञानभाषा प्रतिष्ठानच्या वतीने ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जागर करण्यासाठी आले आहेत. संमेलननाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थानिक आणि साहित्य प्रेमीमध्ये स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे.हैदराबाद येथील संगणक अभियंता सुचिकांत वनारसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मोहिमेत सामील होण्यासाठी अनेक जण आवर्जून ग्रंथ प्रदर्शनातील दालनाला भेट देत आहेत. शिवाय, या मराठी विषयक मोहिमेची माहिती घेऊन त्याला पाठिंबा देत मोहिमेत सहभागी होत आहे. या प्रतिष्ठानच्यावतीने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आरोग्य, साहित्य, निसर्ग, पर्यावरण संवर्धनाविषयी अनेक समूह कार्यरत आहेत. या समूहांच्या माध्यमातून दररोज मराठी भाषेतून त्या- त्या विषयांसंबंधी माहिती शेयर केली जाते. तसेच प्रतिष्ठानच्यावतीने गावोगावी वाचनकट्टे आयोजित केले जातात, या वाचन कट्टयांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीत मराठी भाषा आणि शाळांच्या संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात येते. तसेच त्यांनी अधिकाधिक वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.याविषयी, प्रतिष्ठानच्या सचिव मृणाल पाटोळे यांनी सांगितले की, राज्यभरात प्रतिष्ठानचे ३० हून अधिक विश्वस्त आहेत. हे सर्व विश्वस्त आपआपल्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून मराठी भाषा आणि शाळा यांच्या संवर्धनासाठी प्रतिष्ठानसह काम करीत आहेत. गेल्या तीन दिवसांत ८०० हुन अधिक जणांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यात महाविद्यालयीन तरुणाईचाही लक्षणीय समावेश आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन