शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी विवाहात ‘लव्ह मॅरेज’वाल्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे गेल्या दोन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देव्हॅलेंटाईन डे विशेष : ऑनलाईन प्रक्रियेतून वाढले रजिस्टर्ड मॅरेजचे प्रमाण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन मनांच्या नात्याला कोणत्याही शासकीय दाखल्याची गरज नसतेच. पण विवाहाचे नाते नोंदणीकृत झाले की, पुढच्या जीवनालाही प्रेमासोबतच अधिकृततेची मोहोर लागते. त्यामुळे सुशिक्षित पिढी सध्या रजिस्टर्ड मॅरेज करण्याकडे वळत आहे. यातूनच जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात तब्बल ९७६ विवाह रजिस्टर्ड पद्धतीने झाले. यात लव्ह मॅरेजवाल्यांचे योगदान अधिक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे गेल्या दोन वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.२०१७ पर्यत नोंदणी पद्धतीने होणाऱ्या विवाहांची संख्या जिल्ह्यात नगण्य होती. मात्र नोव्हेंबर २०१७ पासून रजिस्टर्ड मॅरेजची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करताच नोंदणी विवाहांना प्रतिसाद वाढू लागला. २०१८ मध्ये तब्बल ४८० विवाह नोंदणी पद्धतीने झाले. तर २०१९ मध्ये हा आकडा आणखी वाढून ४९६ विवाह नोंदणी पद्धतीने झाले.१४ फेब्रुवारीला ३ विवाहअनेकांनी व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून विवाहाचा मुहूर्त ठरविला आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारीला शहरातील मंगलकार्यालये ‘बुक’ आहेत. तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ३ रजिस्टर्ड मॅरेज होऊ घातले आहेत. हा आकडे वाढूही शकतो, असे विवाह अधिकारी तथा उपनिबंधक वसंत कळंबे यांनी सांगितले. शिवाय, गेल्या दोन वर्षांपासून दररोज २ ते ३ विवाह नोंदणी पद्धतीने होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पर्यटनस्थळ हाऊसफुल्लशहरालगतच्या पर्यटनस्थळावर यानिमित्ताने खास तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये आॅक्सीजन पार्क, बोरगाव डॅम आणि चौसाळा टेकडी या सारख्या ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय काही हॉटेल चालकांनीही या दिवसानिमित्त खास सजावट केली आहे. एकूणच प्रेम दिवस बहरलेला पहायला मिळणार आहे. याशिवाय गार्डन आणि इतर ठिकाणावरही युवकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.पुणे, नागपूर, औरंगाबादवरुन दोन हजार गुलाबांची आयातयावर्षी व्हॅलेन्टाईन-डेकरिता डच गुलाबाची मागणी परजिल्ह्यातून करण्यात आली आहे. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात मागणी झाल्याने फुलांचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे शुक्रवारी एका गुलाबाच्या फुलाकरिता प्रेमीजणांना ४० रुपये मोजावे लागणार आहे. व्हॅलेन्टाईन-डेकरिता फुलांची दुकाने खास सजली आहे. फुलांची मागणी लक्षात घेता आठ दिवसापूर्वीच डच गुलाबाची मागणी नोंदविण्यात आली. एकाच ठिकाणावरून मागणीची पूर्तता न झाल्याने विविध जिल्ह्यातील हे गुलाब मागविण्यात आले आहे. यामध्ये पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेmarriageलग्न