कॉर्पोरेट धोरणाला विरोध : यवतमाळच्या तिरंगा चौकात केले आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने कंत्राटदारांचे पंजीकरण रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे स्थानिक कंत्राटदारांसोबत लाखो बेरोजगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. या धोरणाला विरोध करीत जिल्हा कंत्राटदार संघटनेने येथील तिरंगा चौकात सोमवारी निदर्शने केली. कंत्राटदारांचे पंजीकरण रद्द करून संपूर्ण कामे कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा शासनाचा घाट आहे. स्थानिक कंत्राटदारांना २५ कोटी रुपयापर्यंतची कामे करता यावी इतकी सूट शासनाने द्यावी, घेतलेल्या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली. यावर विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा कंत्राटदार संघटनेने दिला आहे.या आंदोलनात जिल्हा कंत्रटदार संघटना महाराष्ट्र असोसिएशन, विद्युत कंत्राटदार संघटना, यवतमाळ मजुर कामगार महासंघ, यवतमाळ नगर परिषद कंत्राटदार संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर, सचिव अमित उत्तरवार, कोषाध्यक्ष शरद जुमळे, कंत्राटदार आर.बी. गिरोळकर, विलास महाजन, आनंदराव जगताप, मुकुंद औदार्य, सतिश भोयर, राजू राऊत, सुधीर देशमुख, प्रवीण पांडे, संजय चिद्दरवार, सचिन जिरापुरे, राहुल काळे, शैलेश गुल्हाने, सतीश गिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते.
कंत्राटदारांची निदर्शने
By admin | Updated: May 16, 2017 01:31 IST