शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:18 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी एकाच पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसर्वशिक्षा अभियान : १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी एकाच पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.२००६ पासून सर्वशिक्षा अभियान राबविले जात आहे. त्यासाठी अनेकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. मात्र १२ वर्षांपासून काही पंचायत समितींमध्ये हे कंत्राटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांची एकदाही बदली करण्यात आली नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासावर परिणाम होत असल्याची ओरड होत आहे. १२ वर्षांपासून एकाच पंचायत समितीत ठाण मांडून बसल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे अनेक शिक्षकांशी स्रेहाचे संबंध निर्माण झाले आहे. यातून हे कर्मचारी प्रत्यक्षात शाळांना भेट न देता घरूनच गुणवत्तावाढीचे काम करीत असल्याची ओरड होत आहे.जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यातील हे साधन व्यक्ती शाळा भेटीला जातच नाही, अशी ओरड सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. कंत्राटी कर्मचाºयांना दरवर्षी नियुक्ती आदेश दिले जाते. मात्र १२ वर्षांपासून त्यांना एकच पंचायत समिती मिळत असल्याने ते निर्धास्त झाले आहे. सध्या नवनियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परभणी जिल्हा परिषदेने त्याबाबत परिपत्रकही जाहीर केले आहे.मात्र येथील सर्वशिक्षा अभियान नवनियुक्ती आदेश देण्यापूर्वी संबंधितांच्या बदल्या करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषत: तीन तालुक्यातील साधन व्यक्तींची बदली होत नसल्याने इतर तालुक्यातील साधन व्यक्तींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तथापि, शिक्षण विभाग मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे.अध्यक्षांनी दिले सीईओंना पत्रकाही तालुक्यातील साधन व्यक्ती १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी त्यांच्या बदल्या करण्यासंबंधीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. नवनियुक्ती आदेश देण्यापूर्वी परभणी जिल्हा परिषदेप्रमाणे यवतमाळनेही बदल्यांचा निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. या पत्राचे बुधवारी होणाºया स्थायी समिती सभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.