शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

बिष्णोई गॅंगच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला यवतमाळात अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: May 31, 2025 18:30 IST

राजस्थान पोलिसांचे २५ हजारांचे बक्षीस : कुख्यात बिष्णोई व गुज्जर गॅंगसोबत सक्रिय

यवतमाळ : अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना यवतमाळ एलसीबीच्या पथकाला मोठी माहिती मिळाली. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोई आणि बिन्नी गुज्जर गॅंगचा सक्रिय सदस्य यवतमाळात असल्याचे गोपनीय खबऱ्याकडून सांगण्यात आले. पोलिसांनी याची पडताळणी करून शहरातील जांब रोडवरील दांडेकर ले-आऊट येथून त्या सदस्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर राजस्थान पोलिसांनी २५ हजार रोख बक्षीस ठेवले होते. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली.

भूपेंद्रसिंग ऊर्फ भिंडा जरनैलसिंग (वय ३५) रा. ग्राम अहारना खुर्द पोस्ट. मेहटियाना जि. होशियारपूर पंजाब असे अटक करण्यात आलेल्या गॅंगस्टरचे नाव आहे. त्याने २०२३ मध्ये राजस्थानातील बाडनेर येथे हरिपालसिंग ऊर्फ रिंकू (रा. गंगानगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो पसार असल्याने राजस्थान पोलिसांनी भूपेंद्रसिंग याच्यावर २५ हजारांचे रोख बक्षीस ठेवले होते.

भूपेंद्रसिंग हा लॉरेन्स बिष्णोई गॅंग, बिन्नी गुज्जर गॅंग यांच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करत होता. यासाठी त्याला दरमहा २५ हजार रुपये दिले जात होते. ही रक्कम त्याला बिन्नी गुज्जर याचा भाऊ तसेच गोल्डी ब्रार याच्याकडून अमेरिकेतून आर्थिक मदत मिळत होती. राजस्थान पोलिस मागावर असल्याने भूपेंद्रसिंग यवतमाळात आला. मागील दोन वर्षांपासून तो येथे ढाबा व्यावसायिक म्हणून वास्तव्य करीत होता.

एलसीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, जमादार विनोद राठोड, नीलेश राठोड, आकाश सहारे, ममता देवतळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे भूपेंद्रसिंग याला अटक केली. पुढील कारवाई पाेलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

एकूण १७ गंभीर गुन्हे शिरावरबिष्णोई व गुज्जर या गॅंगसाठी काम करणाऱ्या भूपेंद्रसिंग याने पैसे घेऊन अनेकांची हत्या केली आहे. त्याच्यावर तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. पंजाब राज्यात १६, तर राजस्थानमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. तेथे आपला एन्काऊंटर होईल या भीतीने भूपेंद्रसिंग यवतमाळात दडून बसला होता.*

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ