शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक उद्घाटनाविनाच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:38 IST

गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे.

ठळक मुद्देपूर्णत्वास विलंब : राळेगाव येथे प्रवाशांनीच केला जबरीने प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या दहा महिन्यांपूर्वीच पूर्णत्वास आलेले येथील बसस्थानक उद्घाटनाची प्रतीक्षा करीत अखेर विनाउद्घाटनानेच जनसेवेत सुरू करण्यात आले. प्रवाशांनीच बसस्थानकात प्रवेश केल्याने प्रशासन हात चोळत बसले आहे.गेल्या दोन वर्षांपासून या बसस्थानकाचे काम सुरु होते. विविध कारणांमुळे बांधकाम पूर्णत्वास जाण्यास विलंब झाला. यात दोन-दोन पावसाळे, उन्हाळे, हिवाळे निघून गेले. प्रवाशांना या काळात उन्ह, वारा, थंडी, उष्णता, अंधाराचा सामना करावा लागला. रखरखत्या उन्हाळ्यात प्रवाशांना बसण्यास सावलीच नव्हती. अगेर प्रवाशांनी जबरदस्तीने या बसस्थानकात धाव घेतली.वाहतूक नियंत्रक, विविध पासेसचे कार्यालय या ठिकाणी सुरू झाले आहे. कँटीन मात्र अद्याप सुरू झाली नाही. हे बसस्थानक ४२ लाख रुपयांत उभारण्या आले. तरी जागा आजच अपुरी पडत आहे. कंत्राटदाराने प्लाटफार्मसमोर जुन्या-नव्या इमारतीचे वेस्ट मटेरियल तसेच सोडून दिले आहे. त्यामुळे नव्या वास्तूच्या सुंदरतेला गालबोट लागत आहे. बसस्थानकाचे उर्वरित काम बाकी आहे. ते कंत्राटदाराकडून पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी स्थानिक वेळापत्रक व यवतमाळवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलद बस, रातराणी, शिवशाही, स्लिपर कोच कोच आदींचे टाइमटेबल लावणे, या गाड्यांच्या आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा लाखो रुपये खर्च करून बांधलेली वास्तू निरूपयोगी ठरण्याची शक्यता आहे.अंधार कायमचयेथे रात्री शेवटची अमरावती बस ९.३० ते १० वाजता ला येते. त्यावेळी बसस्थानकात अनेकदा अंधार असतो. बसस्थानकात अद्याप वीज, प्रकाशाची परिपूर्ण व्यवस्था नाही. राळेगाववरून लांब पल्ल्याच्या बस सुरू करता याव्या, याकलिता पाच नव्या बसला एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्राचार्य डॉ.अशोक उईके यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांनी आता या बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याकडून प्रवाशांच्या अनेक अपेक्षा आहेत.

टॅग्स :state transportएसटी