शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले. पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : निकष डावलून कामे, वाहनधारक त्रस्त, अपघाताची शक्यता

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात राज्य मार्गावरील पुलांचे बांधकाम निकषाप्रमाणे वळण रस्ते न करताच सुरू करण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहे. काही पुलांवरुन आता वाहतूक सुरु झाली. निमार्णाधीन पुलांच्या बाजूला वळण रस्तेही काढण्यात आले. मात्र दोन्ही कच्चे रस्ते असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.कोणत्याही रस्त्यावरील पुलांचे बांधकाम करताना किमान खडीकरण, आवश्यक रुंदी व योग्य सूचनाफलक असलेले वळण रस्ते तयार करणे आवश्यक आहे. परंतु यवतमाळ, नेरसह कुपटा रस्त्यावरील कामात नियमांना बगल देण्यात आल्याचे सांगितले जाते. दारव्हा ते यवतमाळ ३९ किलोमीटर, दारव्हा-नेर २४ किलोमीटर आणि दारव्हा-कुपटा फाटा २३ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पुलांची संख्या आहे. सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले.पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही. त्याऐवजी थातुरमातुर रस्ता काढून त्यावर साईड शोल्डरच्या खोदकामातील माती टाकण्यात आल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर काही बांधकामाच्या ठिकाणी रिबीनसुद्धा लावण्यात आले नाही. याप्रमाणे रस्त्यावरुन जाणाºया वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली नाही. तिनही मार्गावरील बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र पुलावर माती तशीच आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ कच्चे रस्ते पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास होतो. रात्री बांधकाम लक्षात न आल्यास अपघात होण्याची भीती आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहन घसरुन अपघाताची शक्यता बाळावली आहे.एवढा सगळा त्रास होत असताना कंत्राटदार कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खुलेआमपणे हा गंभीर प्रकार सुरु असून या कामावर नियंत्रण असणारी यंत्रणा मुग गिळून का बसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांवर हलगर्जीपणा होत असल्याने प्रवास करताना एखाद्या वाहनधारकाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकामाच्या चौकशीची मागणीनागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी माती तशीच पडून आहे. निमार्णाधीन पुलाशेजारी कच्चा वळण रस्ता आहे. या कामांची चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल. त्यामुळे सदर सर्व वळण रस्ते राज्यमार्ग दर्जाच्या निकषाप्रमाणे झाले का, याची प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करुन नियमानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग