शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दलित-मुस्लीमांना दूर ठेवण्याचे षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:46 IST

मोदी सरकार मुस्लीम समाजाला शरीयतपासुन दूर नेण्याचे षडयंत्र रचत असून दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असउद्दीन ओवेसी यांनी केला.

ठळक मुद्देओवेसींचा आरोप : उमरखेडमध्ये झाली जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मोदी सरकार मुस्लीम समाजाला शरीयतपासुन दूर नेण्याचे षडयंत्र रचत असून दलितांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार बॅरिस्टर असउद्दीन ओवेसी यांनी केला.उमरखेड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर आमदार इम्तयाज जलील, मुफ्ती असफाक कासमी, इरफानभाई, नगरसेवक मुजीब बागवान, जलील कुरेशी आदी उपस्ति होते. पुढे बोलताना ओवेसी यांनी मोदी आणि योगी सरकारसह कॉग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला. ‘तलाक’च्या मुद्यावर पंतप्रधान मुस्लीम महिलांचे तारणहार असल्याचा आव आणत आहेत, तर जम्मूमध्ये आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचारावर बोलायला त्यांना वेळ मिळत नाही. केंद्र शासनाच्या या धोरणाविरूद्ध ज्या महिला रस्त्यावर उतरल्या, त्यांचे ओवेसी यांनी कौतुक केले.मुस्लीम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी शिक्षणाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘तलाक’वर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकार त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कायदा तयार करीत असल्याबद्दल निषेध केला. आता दलित व मुस्लीम बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी जम्मूत अत्याचार करून मृत पावलेल्या आठ वर्षीय बालिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उमरखेडसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संसदेत आवाज का उठविला नाहीमजलीस पक्षावर भाजपा समर्थक असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस व राष्दवादीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ओवेसी यांनी दिला. संसदेत जेव्हा ‘तलाक’वर चर्चा सुरु होती, त्यावेळी कोणत्याही धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांनी किंवा त्या पक्षातील मुस्लीम खासदारांनी आवाज का उठवला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.