शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून मोघे-कासावारात जुंपली

By admin | Updated: January 28, 2016 02:24 IST

काँग्रेस कमिटीच्या नव्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरून प्रजासत्ताक दिनी शिवाजीराव मोघे व वामनराव कासावार यांच्यात चांगलीच जुंपली.

वादात संध्यातार्इंचीही उडी : प्रमुख स्पर्धकाला मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटी घडविल्याने रोष यवतमाळ : काँग्रेस कमिटीच्या नव्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरून प्रजासत्ताक दिनी शिवाजीराव मोघे व वामनराव कासावार यांच्यात चांगलीच जुंपली. या वादात संध्याताई सव्वालाखे यांनीही उडी घेत मोघेविरोधी सूर आळवला. मंगळवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते-पदाधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर काँग्रेस कार्यालयात सर्व नेते बसलेले असतानाच शिवाजीराव मोघेंनी पक्ष-संघटनेचा विषय छेडला. त्यावरून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार हे मोघेंवर चांगलेच भडकले. त्यावर प्रत्येक विषय ‘पर्सनल’ घेऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न मोघेंनी केला. मात्र कासावार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तुम्ही लोकांनी मला विविध कार्यक्रमात किती वेळा राजीनामा मागितला, तुम्ही नवा अध्यक्ष नेमत नाही आणि मला जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्याचे स्वातंत्र्यही देत नाही, अशा शब्दात कासावारांनी आपली नाराजी प्रकट केली. शिवाय जिल्हाध्यक्ष पदावर सर्व संमतीने निर्णय न घेता विशिष्ट व्यक्तीला झुकते माप देता, त्यांच्या मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटी-गाठी घडवून आणता, असे म्हणून कासावारांनी मोघेंच्या कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला. हा वाद सुरू असतानाच संध्याताई सव्वालाखे यांनीही मोघेंना सुनावले. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समक्ष मोघे-कासावारांमधील ही तू-तू-मै-मै बराच वेळ सुरू होती. अखेर रागारागात मोघे उठून कार्यालयाबाहेर गेले. मोघेंच्याच एका कार्यकर्त्याने समजदारी दाखवित कासावारांनाही नाश्त्याच्या निमित्ताने बाहेर बोलविले. त्यामुळे हा वाद तेथे थांबला. मात्र नेत्यांमधील या वादाची दिवसभर काँग्रेसमध्ये चर्चा होती. जिल्हाध्यक्षपदासाठी मोघे गटाकडून आपल्या सोईच्या व्यक्तीचे नाव रेटले जात आहे. या व्यक्तीला मोघेंनी गेल्या आठवड्यात मुंबई-दिल्लीत पक्ष श्रेष्ठींच्या भेटीही घालून दिल्या. या भेटींसाठी आडोसा मात्र ‘आदिवासींच्या मेळाव्यासाठी सोनिया गांधींना पांढरकवड्याचे निमंत्रण’ असा घेतला जात आहे. ‘त्या’ स्पर्धक व्यक्तीच्या भेटी घालून दिल्यानेच मोघेंना कासावारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्या व्यक्तीच्या पाठीशी मोघे असले तरी पक्षातील इतरांचा आणि विशेषता दुसऱ्या फळीचा त्या नावाला तेवढाच विरोध आहे. आयात केलेल्यांना महत्वाचे पद देऊ नये, अशी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. एकूणच प्रजासत्ताक दिनी नेत्यांमधील गटबाजीचे उघड दर्शन कार्यकर्त्यांना झाले. (जिल्हा प्रतिनिधी)