शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दारव्हा तालुक्यात काँग्रेसची पुर्ववैभवासाठी धडपड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे ...

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय

दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येते. प्रदीर्घ कालावधीनंतर विविध उपक्रमांमुळे नेते, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी ही धडपड असून, यात पक्ष कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

एकेकाळी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९६७ व १९७८ ची विधानसभा निवडणूक सोडली, तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु २००४ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी तब्बल २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आणि काँग्रेसच्या या किल्ल्याचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली. फेररचनेत दिग्रस मतदार संघ झाल्यानंतर दोनदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी तसेच वर्तमान लोकसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार क्षेत्रातसुध्दा पिछेहाट झाली. यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली होती. परंतु सध्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे.

पक्षांतर्गत कार्यक्रम, कार्यकर्ता बैठका, मेळाव्याचे आयोजन शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केले जात आहे. पक्ष लाईमलाईट ठेवला जात असल्याने त्याचा लाभ होताना दिसत आहे. अपवाद वगळता अनेक स्थानिक नेते काँग्रेसमधे टिकून आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व, प्रत्येक गावात कार्यकर्ते, युवकांची फळी, अनेक ग्रामपंचायत, सोसायटीवर वर्चस्व या पक्षाच्या जमेच्या बाजू आहे.

आगामी संस्थांच्या निवडणुकीसाठी मेळावा घेऊन काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी जोश भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता या सर्व बाबींचा पक्षाला लाभ होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाॅक्स

सत्तेच्या लाभापासून वंचित

राज्यात सत्तेत सहभाग असला, तरी तालुक्यात मात्र काँग्रेस सत्तेच्या लाभापासून वंचित आहे. मंडळ, महामंडळ सोडा, साध्या तालुका समित्यांवर कुणालाही संधी मिळाली नाही. कोणतीही कामे होत नसल्याचे शल्य आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना सामावून घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे.

कोट

तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. विविध उपक्रम राबवून चालना दिल्याने सक्रियता वाढली. पक्षाची स्थिती सुधारल्याने येणाऱ्या निवडणुकांत चांगला फायदा होईल

प्रकाश नवरंगे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस दारव्हा