शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सावळी सर्कलमध्ये काँग्रेसला गळती

By admin | Updated: January 11, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सावळी सर्कलमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे.

पक्ष प्रवेश सत्र : निवडणुकीच्या तोंडावर सोहळे वाढले सुरेश पवार सावळीसदोबा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सावळी सर्कलमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने या भागातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहे. जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढल्याचे सांगितले जाते. सावळी-पळशी जिल्हा परिषद गट, सावळी व पळशी पंचायत समिती गणावरही काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. याच गटातील सोनबा मंगाम यांनी आता काँग्रेस सोडली आहे. यापूर्वी प्रकाश डोमा राठोड (कृष्णनगर), नूरसिंग राठोड (चिचबर्डी), अनिल बन्सोड (कापेश्वर), खांदवे (वरूड भ) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला. यामुळे सावळी-इचोरा जिल्हा परिषद गटात निवडणुकीपूर्वीच भाजपाने काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. या गटामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना अशी प्रथमच चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. पक्ष प्रवेशाचा फायदा नेमका कुणाला होणार हे आज सांगता येत नसले तरी सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक आव्हान देणारी ठरणार आहे. काँग्रेसमधील आणखी काही मंडळी बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. तथापि सावळी-इचोरा गटासाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही तगड्या उमेदवारांचा शोध घेत आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचाही उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. इचोरा व सावळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढणाऱ्यांचीही यादी लांबलचक आहे. प्रत्येक पक्षातील इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ सुरू आहे.