शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.

ठळक मुद्देदहा जागांवर विजय : शिवसेना-भाजपा युतीला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मुळावा गटातील दगडू चव्हाण, उमरखेड गटातील माया रावते, बिटरगाव ब गटातील दत्तराव रावते, विडूळ गटातील गजानन बोन्सले, ढाणकी गटातील बाळासाहेब ऊर्फ वसंत चंद्रे, निंगनूर गटातील सुनील गव्हाळे, भवानी गटातील रघुनाथ बेले व हमाल-मापारी गटातील अजमतखाँ पठाण आणि अडते व व्यापारी गटातील राधेश्याम भट्टड, विनय कोडगिरवार यांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीचे बेलखेड गटातील सुदर्शन ठाकरे, पोफाळी गटातील उषाताई जाधव, मार्लेगाव गटातील नारायण नरवाडे, सुकळी ज. गटातील गौतम ऊर्फ बाळासाहेब नाईक, देवसरी गटातील शामराव वानखेडे, चातारी गटातील कृष्णा देवसरकर आणि खरबी गटातील दिलीप जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव हे एकमेव उमेदवार कुरळी गटातून विजयी झाले.सहकार प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रथमच बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रत्येक शेतकरी सभासदाला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे मतदारांची संख्या तब्बल ६६ हजारांच्यावर होती. त्यापैकी जवळपास निम्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार भगवान कांबळे व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करताच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते राम देवसरकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.‘गड आला पण सिंह गेला’काँग्रेसचे दत्तराव शिंदे हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र देवसरी गटातून त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे काही उमेदवार थोड्या फरकाच्या मताने पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गणित बिघडविल्याने काँग्रेसला दहा जागांवरच विजय मिळाला.