यवतमाळ : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांचा यवतमाळ युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. येथील मेडिकल कॉलेज चौकात मंगळवारी दुपारी प्रतिकात्मक पुतळा जाळून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वा हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री गिरीराजसिंग यांनी केलेल्या वर्णभेदी टिकेचा निषेध करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी यवतमाळ-वाशिम लोकसभा युवक काँग्रेस, यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेविका उषा दिवटे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मिर्झापुरे, विक्की राऊत, शेखर मडावी, अनिल यादव, सृष्टी दिवटे, श्वेता दिवटे, अनिल गाडगे, मेघा राऊत, निशा नागतोडे, नीलेश चौधरी, कृष्णा पुसनाके, आकाशा सामोशे, शुभम लांडगे, प्रदीप मडसे, गजानन रोकडे, अक्षय पारडे, खुशाल आंबीलकर, गुणवंत डायरे, विनोद कांबळे, हरीष कटके, कमलेश गवळी, बाबा यादव, दीपक बारसे, सचिन मोहरकर, बोबीसिंग धालीवले, सुदाम मडावी, सुरेश जुळे यांच्यासह मोठ्यासंख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
काँग्रेसने राज्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
By admin | Updated: April 8, 2015 02:14 IST