शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
5
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
6
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
7
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
8
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
9
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
10
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
11
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
12
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
13
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
14
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
15
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
16
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
17
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
18
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत पळाला; चंद्रपुरातील घटना
19
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
20
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे

काँग्रेसने मागितले ‘एमएलसी’साठी अर्ज

By admin | Updated: June 11, 2016 02:47 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातून इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला शह : जिल्हा काँग्रेसच्या गोटात उत्साह ंयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातून इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागविले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार, हे निश्चित मानले जात आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीने इच्छूकांना आपल्याकडे अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यवतमाळ मतदारसंघातून २०१० मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप बाजोरिया यांना उमेदवारी दिली होती. यापूर्वीसुद्धा हा मतदारसंघ मागील चार टर्मपासून राष्ट्रवादीच्या वाट्यावर सोडण्यात आला आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यानंतर अनेक घडामोडी जिल्ह्यात झाल्या. आता तर काँग्रेसकडून विधान परिषद लढण्याबाबतचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.विधान परिषदेची निवडणूक ही आॅक्टोबरमध्ये होत असली तरी आतापासूनच त्यासाठी चाचपणी सुरू आहे. वरिष्ठ स्तरावरच्या वाटाघाटीत काँग्रेसने यवतमाळ मतदारसंघ मिळविल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या गोटात सध्यातरी उत्सुकतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात काँग्रेसकडे माजी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. यातूनही अनेक जण विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्यास इच्छूक आहेत. विधान परिषदेची निवडणूक लढण्यासाठी आर्थिक सुबत्ता हीच महत्त्वाची पात्रता मानली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)