शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जुन्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पुन्हा शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 21:38 IST

काँग्रेस आणि देश जेव्हा जेव्हा अडचणीत आले, त्या-त्या वेळी यवतमाळ जिल्ह्याने आणि विदर्भानेच मदतीचा हात पुढे केला. देशाची आणि राज्याची घडी नीट बसविण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसलाच जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन मंगळवारी महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेसजणांनी जनसंघर्ष यात्रेतून केले.

ठळक मुद्देजनसंघर्ष यात्रेचा आरंभ : जवाहरलाल दर्डा यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला -चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस आणि देश जेव्हा जेव्हा अडचणीत आले, त्या-त्या वेळी यवतमाळ जिल्ह्याने आणि विदर्भानेच मदतीचा हात पुढे केला. देशाची आणि राज्याची घडी नीट बसविण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसलाच जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन मंगळवारी महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेसजणांनी जनसंघर्ष यात्रेतून केले. येत्या निवडणुकीत यवतमाळमधून सर्वाधिक आमदार आणि खासदार काँग्रेसचेच निवडून जातील, असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.श्रीक्षेत्र कळंबच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन काँग्रेसच्या पश्चिम विदर्भातील जनसंघर्ष यात्रेचा चौथा टप्पा यवतमाळातून सुरू करण्यात आला. माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याने एकेकाळी राज्याला नेतृत्व दिले. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने दोन समर्थ मुख्यमंत्री दिले. तर स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा हे उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा लौकिक वाढविला. राज्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी त्यांनी धडपड केली. पण सध्याच्या भाजपा-सेना सरकारने ‘कुठे नेऊन ठेवले यवतमाळ माझे’ म्हणण्याची वेळ आणली आहे. सावळेश्वरच्या (ता. उमरखेड) शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. रोज किड्या मुंग्यांसारखी माणसे मरत आहे. तरी सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. या जिल्ह्याने भाजपाला ५ आमदार दिले, एक आमदार शिवसेनेला दिला. त्यातील दोघे आता मंत्री आहेत. कुठे गेले ते मंत्री? एकेकाळी गुंतवणुकीत, प्रगतीत क्रमांक एकवर असलेला महाराष्ट्र आज शेतकरी आत्महत्येत पहिल्या क्रमांकावर आहे. तर यवतमाळ जिल्हा सध्या गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. जिल्ह्यात बोगस कीटकनाशक फवारणीतून २१ शेतकºयांचा मृत्यू झाला. सरकारने काय केले, तर चौकशी लावली. खोदा पहाड निकला चुहा. चौकशीतून कोणीच दोषी नसल्याचे सांगितले. मग माणसे मेली कशी? या ज्वलंत प्रश्नांवर सरकार बोलायलाच तयार नाही. म्हणूनच जनसंघर्ष यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळतोय.निवडणूक जवळच, ‘अलर्ट’ राहामाजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, लोकसभेला केवळ ३ महिने राहिले आहे, त्यामुळे लोकांना ‘अलर्ट’ करण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा आहे. काम नसताना नोटाबंदी करून लोकांचा छळ करणारे हे सरकार जाणारच आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसात भाजपाला ‘राम’ म्हणण्याशिवाय पर्याय नाही. तर हाच धागा धरून प्रा. वसंतराव पुरके मिश्कील शैलीत म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी खूप काम केले, आता पाच वर्ष आराम करा असे म्हणत लोकांनी २०१४ मध्ये आम्हाला घरी बसविले. पण या भाजपा सरकारने देशात विष कालवले. आता सावध व्हा. २०१४ मध्ये जन्मलेला वेताळ २०१९ मध्ये शांत करा. तर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे यांनी महिलांवरील अत्याचार वाढल्याचे सांगितले. काँग्रेसने गटतट विसरून काम केले तर पुढचे ६० वर्षे भाजपा सरकार येणार नाही. राफेल विमानांच्या खरेदीत प्रधानसेवकाने मोठा घोळ केल्याचा आरोप माजी आमदार वामनराव कासावार यांनी केला. पोहरादेवीत भाजप-शिवसेनेने नगारा वाजविला आता आम्ही यांचे बारा वाजवू, असा इशारा आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.५७ हजार शेतकऱ्यांची माफी कधी?संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाचे वातावरण असूनही भाजपा-सेनेने केवळ ९ तालुक्यात दुष्काळ जाहीर करून भेदभाव केला आहे. सरसकट संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केली. वर्ष उलटून गेल्यावरही जिल्ह्यातील ५७ हजार शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, असे यावेळी सांगण्यात आले.यवतमाळने काँग्रेसला ताकद दिलीयवतमाळ परिसराबाबत आपुलकी व्यक्त करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, इंदिरा गांधी यांना देशात सर्वाधिक विश्वास विदर्भावर होता. तसाच विश्वास राजीव गांधींचा होता आणि आता सोनिया गांधी आणि राहुल गांधींचाही आहे. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात गेले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रीपद यवतमाळच्या वसंतराव नाईकांना विश्वासाने सोपविले. त्यावेळी अन्नधान्याची टंचाई असूनही नाईकांनी महाराष्ट्र पुढे नेला. याच जिल्ह्याने काँग्रेसला अडचणीच्या काळात ताकद दिली. देशाची लोकशाही वाचविण्यासाठी पुन्हा एकदा ती वेळ आली आहे.दाभडीत भलताच माणूस चहा पिऊन गेलानरेंद्र मोदींनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेवून देशभरातील शेतकऱ्यांना आश्वासने दिली. पण एकही पूर्ण केले नाही. चहा आपला होता, दूध आपले होते, साखर आपली, कपबशीही आपली होती. पण चहा मात्र भलताच माणूस पिवून गेला. अन् जिल्ह्यातल्या शेतकºयांच्या माथी मात्र दारिद्र्य आले. त्यामुळे आता जनतेने जागे होऊन काँग्रेसला सत्ता सोपवावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.‘वा रे पंजा, आया पंजा’जनसंघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाभरातून हजारो नागरिकांनी हजेरी लावली. वारे पंजा आया पंजा, अशा घोषणांनी समता मैदानाचा परिसर दणाणून गेला होता. तर जाहीर सभेत प्रत्येक नेत्याचे भाषण संपताच ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं’ अशा आरोळ्या दिल्या जात होत्या. व्यासपीठावरून विद्यमान सरकारवर होणाºया टीकेला समोरच्या गर्दीतून तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांचा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. तर एमआयएम, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांसह एका निवृत्त वनअधिकाºयानेही काँग्रेस प्रवेश केला. भाजपा-सेनेच्या सरकारने गेल्या चार वर्षात हाहाकार माजविला आहे. सर्वच घटक त्रस्त आहेत. त्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी ही जनसंघर्ष यात्रा असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी स्पष्ट केले.