लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथे सीसीआयमार्फत झालेल्या कापूस खरेदीत गोंधळ झाला. त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. २१ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी आपले नातेवाईक, मित्र आदींच्या नावाने सातबारे ऑनलाईन करून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी आला की, तो त्रुटी काढून परत करायचा आणि तोच कापूस हतबल झालेल्या शेतकऱ्यांजवळून दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करून जवळच्या नातेवाईकांच्या नावाने सीसीआयला विकायचा, असा फंडा व्यापाऱ्यांनी वापरला.हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात समाविष्ट असलेल्या सर्वांना ‘वाटा’ मिळत असल्याने कुणाचीही कुठे तक्रार झाली नाही. सोबतच सीसीआयने उच्च प्रतीच्या कापसापासून व हलक्या प्रतीच्या कापसापासून तयार झालेल्या गठाणीत हेराफेरी करून शासनाची आर्थिक लूट केली. बाजार समीतीने गावांची एबीसीडीप्रमाणे कापूस खरेदी सुरू केली. या प्रक्रियेत चार गावे व्हायला महिला लागला. आता शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचनामा होणार असल्याचा नवा आदेश येऊन धडकला. त्यामुळे आपला कापूस कधी घेणार, कधी चुकारे मिळणार, त्यातून कधी बियाणे खरेदी करणार, असे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे सीसीआय, खासगी व्यापारी, बाजार समितीचा एक अधिकारी आदी शेतकरी गळाला कसे लागतील, व त्यांना कसे लुटायचे, याचे नियोजन करीत आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार होत असून सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मोरेश्वर वातीले यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.बाजार समिती शेतकºयांच्या पाठीशीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समिती सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. सीसीआयच्या कापूस खरेदीमध्ये कापसाचा काटा होईपर्यंत बाजार समितीची भूमिका असते. ती भूमिका बाजार समिती चोखपणे बजावत आहे. त्रुटी काढून शेतकऱ्यांचा कापूस परत करणे, तोच कापूस पुन्हा घेणे, गठाणीची हेराफेरी करणे हा विषय पूर्णपणे सीसीआय केंद्रप्रमुखाचा आहे. याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत बाजार समिती आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले.
कापूस खरेदीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. २१ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले.
कापूस खरेदीत गोंधळ
ठळक मुद्देघाटंजी तालुका : सीआयडी चौकशीची ‘सीएम’कडे मागणी