शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

गहाण दागिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:35 IST

एकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे.

ठळक मुद्देस्पष्ट आदेशाची प्रतीक्षा पाच वर्षांपूर्वीची यादी, सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील कर्ज

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोन्या-चांदीचे दागिने परवाना प्राप्त सावकाराकडे तारण ठेऊन शेतकऱ्यांनी खरीप-रबी हंगामात शेतीसाठी कर्ज उचलले. मात्र या कर्जाची माफी देताना आता नेमका कोणता निकष लावला जाईल, याबाबत सहकार प्रशासनात संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेना युती सरकारने दोन दिवसांपूर्वीच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ३७ निर्णय घेतले. त्यात परवाना प्राप्त सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचाही निर्णय घेतला गेला. या निर्णयानंतर सहकार प्रशासनात या कर्जाचा ताळेबंद जुळविण्याची धडपड सुरू झाली. परंतु अद्याप स्पष्ट आदेश जारी न झाल्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांयांमध्येही किती शेतकऱ्यांना नेमक्या किती रकमेची कर्जमाफी मिळणार याबाबत संभ्रमाची स्थिती पाहायला मिळेत आहे.आजच्या घडीला सहकार प्रशासनाकडे ३० नोव्हेंबर २०१४ ला बनलेली यादी उपलब्ध आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी सराफ-सुवर्णकार अर्थात परवाना प्राप्त सावकारांकडे (मनीलेंडर्स) तारण ठेवलेल्या दागिन्यांवरील कर्जाचा हिशेब केला गेला होता. अनेक महिनेपर्यंत या सावकारांचे अभिलेखे ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली गेली होती. सावकारांना सहनिबंधकांनी समक्ष पाचारण करून हिशेबाची खातरजमा केली होती. या संपूर्ण तपासणीनंतर सहकार प्रशासनाने सरकारला अहवाल सादर केला. त्यात सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील परंतु जिल्ह्यांतर्गत आणि परवाना क्षेत्राबाहेरील पण जिल्ह्याच्या बाहेर अशा दोन प्रकारात यादी बनविली गेली होती. या यादीतील कर्जमाफी गेल्या पाच वर्षांपासून सरकारच्या विचाराधीन होती. अखेर त्याला मुहूर्त भेटला व कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. आता या निर्णयानुसार शासन आदेश (जीआर) जारी होण्याची सहकार प्रशासनाला प्रतीक्षा आहे.अमरावती विभागाचा आकडा ४४ कोटीएकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे. त्यांनी ३९ हजार २१२ शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची रक्कम ४३ कोटी २७ लाख ५९ हजार एवढी आहे.परवान्याच्या हद्दीबाहेर आणि बाहेरील जिल्ह्यात कर्ज वाटणाऱ्या सावकारांची संख्या ११६, शेतकरी संख्या एक हजार ५३१, तर कर्जाची रक्कम एक कोटी ३८ लाख १८ हजार एवढी आहे.जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील मिळून परवाना प्राप्त सावकार एकुण ५४१, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४० हजार ७४३, तर कर्जाची रक्कम ४४ कोटी ६५ लाख ७६ हजार एवढी होत आहे.सरसकट माफी मिळाल्यास अमरावती विभागात ४४ कोटी ६५ लाखांची माफी मिळण्याची शक्यता सहकार प्रशासनात व्यक्त केली जात आहे.सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी त्याबाबत नेमके आदेश जाहीर झालेले नाहीत. नेमके कोणते कर्ज ग्राह्य धरायचे, त्यावर व्याज किती हे स्पष्ट झाल्यानंतरच माफीचा नेमका आकडा सांगणे शक्य होणार आहे.- राजेश दाभेराव, विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी