शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:58 IST

शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांकडून निषेध : नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. नामांकन अर्ज दाखल झाले आहे. शहरात राजकीय वातावरण तापत आहे. युती, आघाडी होत आहे. मात्र काही बाबी कार्यकर्त्यांच्या असंतोषालाही कारणीभूत ठरत आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली युती त्यातीलच एक प्रकार आहे. शहरात काँग्रेसची तेवढी ताकद राहिली नाही. म्हणूनच राष्ट्रवादीची सोबत घेतली, असे खुद्द कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पालिकेत युती केली. माजी मंत्री माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे, वसंत घुईखेडकर यांच्यात बैठक होऊन युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसला या मुद्यावर ही युती घडली. बसपाचा उमेदवार म्हणून सर्वत्र जाहीर झालेल्या एका व्यक्तीलाही काँग्रेसने उमेदवारी दिली.या सर्व घडामोडी होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यांनी चक्क निषेध नोंदविला. विश्वासात न घेता युती करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. निषेध सभेला काँग्रेसचे पंजाबराव खोडके, सत्यविजय गुल्हाने, अनिल चव्हाण, मोहन खोडके, अन्सार उल्ला खान, सतीश तलवारे, बाबाराव पडोळे, अनिल चव्हाण, पीयूष अजमिरे, साजित खान, कुणाल मिसळे, विनोद पाटमासे, सुरेश बगमारे, राहुल मिसळे, नजीर खाँ राही, जफर खान आदी उपस्थित होते.प्रामाणिकतेवर शंकायुतीमध्ये दोनही पक्षाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. कुठल्या वॉर्डात कुणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित नाही.मात्र दोन्ही पक्ष एकमेकाला सुटलेल्या जागांचा प्रामाणिकपणे प्रचार करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वीच एवढा असंतोष असेल तर पुढील चित्र कसे राहील याचा अंदाज येतो.

टॅग्स :congressकाँग्रेस