शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST

पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने हाती मिरचीपूड घेऊन या आंदोलकांचा सामना केला.

ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याला विरोध : मारवाडी चौकात गालबोट, मेनलाईनमध्ये लाठीचार्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंद पुकारला होता. या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र यवतमाळात बंदला दोन घटनांनी गालबोट लागले.पहिली घटना मारवाडी चौकात घडली. दुकाने बंद करण्यासाठी आलेले आंदोलक व व्यापारी समोरासमोर उभे ठाकल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी एका मिरची विक्रेत्याकडे दगड भिरकावून साहित्याची फेकाफेक केली गेली. त्यानंतर या व्यापारी व त्याच्या पत्नीने हाती मिरचीपूड घेऊन या आंदोलकांचा सामना केला. उपस्थित पोलिसांनी या जमावापुढे बघ्याची भूमिका घेतल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून पोलीस बोलविले. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी सहकाऱ्यांसह मारवाडी चौकात पोहोचून आंदोलकांना पिटाळून लावले. यावेळी बंदसमर्थक व विरोधक मोठ्या संख्येने तेथे जमले होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.गालबोट लागण्याची दुसरी घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास मेनलाईनमधील बाजारपेठेत घडली. नेहरू चौकात आंदोलक व व्यापारी यांच्यात घोषणाबाजीवरून तणाव वाढला. दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याने बाचाबाची झाली. अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी लाठीचार्ज करताच जमाव पांगला. मात्र त्यानंतर काही वेळाने हा जमाव पुन्हा तेथे एकवटला. गांधी चौकातही दुकानासमोर बसलेल्यांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. मात्र पोलीस कुमक मोठी असल्याने या आंदोलकांनी शहरातून पुढे शांततेने मार्च काढला. शहरातील बाजारपेठ बंद करीत आंदोलक संविधान चौकात पोहोचले. तेथे आंदोलकांना संबोधित करण्यात आले. आंदोलकांच्या हातातील घोषणापत्रांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. बंद व मोर्चात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशासनाला निवेदन देवून बंदच्या आंदोलनाची सांगता झाली. बंद दरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष कुंदा तोडकर यांनी केले.यवतमाळ शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात तालुकास्तरावर संमिश्र बंद राहिल्याचे वृत्त आहे. तालुका व उपविभागीय प्रशासनाला बंद समर्थकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.महानिरीक्षकांची माहितीआपल्या दुकानावर चालून आलेल्या आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी हाती मिरचीपूड घेत त्यांना पिटाळून लावणाऱ्या रणरागिनी लिलाबाई रेकवार यांचा सत्कार करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. घटनेच्यावेळी पोलिसांची संख्या तेथे नगन्य होती. पोलिसांनाही न जुमाणणाऱ्या या आंदोलकांना लिलाबाईने त्यांच्यावर मिरचीपूड फेकत त्यांना पिटाळून लावले. त्यांच्या या धाडसाचे पोलिसांकडून कौतुक केले जात आहे.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी