शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:43 IST

भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भविष्यात जिल्ह्याला टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल, राष्ट्रीय पेयजल तसेच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे गावागावातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामे करावी, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे उपस्थित होते.नागरिकांना पाणी मिळावे म्हणून गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी दोन वर्षात जवळपास १३ कोटी रुपये देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी स्त्रोतासाठी प्रस्तावित करा. विहीर अधिग्रहण आणि टँकरबाबतच्या प्रस्तावांचे अधिकार आता उपविभागीय स्तरावर देण्यात आले आहे. ज्या नागरिकांनी प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी दिल्या अशा पुनर्वसित गावांमध्ये टँकरची गरज पडू देऊ नका. मग्रारोहयोअंतर्गत जलसंधारणाची कामे हाती घ्या तसेच जलयुक्तची कामे जुनअखेरपर्यंत संपविण्याचे नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.यावेळी ना.येरावार यांनी पाणी टंचाई, उपलब्ध पाणीसाठा, चारा टंचाई, दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजना, दुष्काळनिधी वाटप, बोंडअळी निधी वाटप, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना, नरेगाअंतर्गत सुरू असलेली कामे आदींचा आढावा घेतला.नगर पालिका हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंगनगर पालिका हद्दित पावसाचे पाणी अडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने नाविन्यपूर्ण योजनेतून आता रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासकीय तसेच खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. यवतमाळ पालिकेअंतर्गत सद्यस्थितीत वॉर्डावॉर्डात जावून नागरिकांना रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMadan Yerawarमदन येरावार