शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करवाढीच्या ठरावाविरोधात आरोग्य सभापतींची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:17 IST

नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात पालिकेकडून अव्वाच्या सव्वा कर आकारणी होत आहे. याबाबत चुकीचा ठराव घेण्यात आला आहे, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएजन्सीला ६० लाखांची देयके : ३०८ च्या याचिकेवर सुनावणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगर परिषद क्षेत्रात समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागात पालिकेकडून अव्वाच्या सव्वा कर आकारणी होत आहे. याबाबत चुकीचा ठराव घेण्यात आला आहे, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतरही संबंधित एजन्सीला ६० लाखांची देयके देण्यात आल्याने आरोग्य सभापतींनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.नगर परिषदेची हद्दवाढ झाली असताना ग्रामीण क्षेत्रातील जी घरे कर निर्धारणातून सुटली त्यांचाच सर्वे करण्याचा ठराव २ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात आला. मात्र याच ठरावाचा आधार घेत खोडतोड करून सरसकट घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी एजन्सी निवडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव चुकीचा व नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणारा असल्याचे आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी सर्वसाधारण सभेत उघड केले. त्यानंतर २० जून २०१७ ला कलम ३०८ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली. हे प्रकरण सुनावणीत असतानाच सर्वे करणाºया एजन्सीचे ६० लाखांची देयके देण्यात आली. यावर कळस म्हणजे डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ठरावावर लेखी स्वरूपात आक्षेप घेण्यात आला. मात्र तोही मुद्दा सभेच्या इतिवृत्तात ठळकपणे मांडला नाही.कंत्राटदार एजन्सीचे हितसंबंध जोपासणाऱ्या तत्कालीन लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणीही नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी केली आहे. वाढीव कराच्या आकारणीला विरोध होत असतानाच पालिकेकडून कोणत्या आधारावर देयके देण्यात आली, असा जाब विचारण्यात आला. आता या तक्रार अर्जावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढीव क्षेत्रातील जनतेवर नगरपरिषदेत आल्यानंतर सातत्याने अन्याय केला जात आहे. येथील सदस्य वारंवार समस्या मांडूनही पालिका प्रशासन कंत्राटदारधार्जिनी भूमिका घेत असल्याचा आरोपही चिंडाले यांनी केला आहे.‘त्या’ सदस्यांवर अपात्रतेची मागणीवाढीव क्षेत्रातील सर्वेक्षणाबाबत घेण्यात आलेला ठराव चुकीचा आहे. मुळात २०१६ च्या ठरावाचा आधार घेत मोडतोड करून चुकीचा ठराव घेण्यात आला. या ठरावासाठी ज्या सदस्यांनी अनुमोदक व सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नगरपरिषदेत स्वत:च्या सोईचे कामकाज करण्यासाठी ठरावात मोडतोड केली जाते. डिसेंबरच्या सभेतील इतिवृत्त लिहिताना मोठ्या प्रमाणात फेरबदलही केला आहे. याबाबत तक्रार करण्यात आली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ