शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचा मारा व जागीच निपटारा

By admin | Updated: April 25, 2017 01:08 IST

पैसे भरले पण कनेक्शन दिले नाही... शासकीय जागेत अनधिकृत वीजपुरवठा दिला...

उर्जामंत्र्यांचा जनता दरबार : आर्णी, पुसद, घाटंजी तालुक्यातील तक्रारी सर्वाधिक यवतमाळ : पैसे भरले पण कनेक्शन दिले नाही... शासकीय जागेत अनधिकृत वीजपुरवठा दिला...डीपी बदलवून द्या... महावितरणच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या तक्रारींचा पाऊसच सोमवारी थेट उर्जामंत्र्यांपुढे कोसळला. पण उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आली तक्रार लगाव अधिकाऱ्यांना फटकार, अशा शैलीत प्रत्येक तक्रारीचा जागच्या जागी निपटारा करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी गाऱ्हाणे मांडत होते अन् मंत्र्यांचे प्रश्न दोषी अधिकाऱ्यांचा थरकाप उडवित होते. सोमवारी यवतमाळात पार पडलेल्या उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारातील हे चित्र ग्राहकांना सुखावणारे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना कामास लावणारे होते. ना. बावनकुळे यांच्या हस्ते विविध वीज उपकेंद्रांचे लोकार्पण झाल्यानंतर येथील महावितरणच्या कार्यालयात लगेच जनता दरबाराला सुरूवात झाली. एकंदर २३ तक्रारी जनता दरबारासाठी आधीच नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, दरबार जसा सुरू झाला, तसतशा तक्रारी वाढत तक्रारींची संख्या शंभरावर पोहोचली.निश्चल येरावार यांनी ढाणकी येथे वीज उपकेंद्राची मागणी करताच मंत्र्यांनी लगेच मंजुरी देऊन टाकली. बोरीअरब (ता. दारव्हा) येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याची तक्रार हरीश लढ्ढा या शेतकऱ्याने केली. तर अंजनखेड (ता. आर्णी) येथील सुशील नाननवरे यांनी पैसे भरूनही आपल्याला कनेक्शन मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच कनेक्शन दिल्याचे सांगितले. मात्र, माझा जनता दरबार होता म्हणून तातडीने काम केले का? असा सणसणीत सवाल विचारत उर्जामंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घाम फोडला. तक्रार येण्याची वाट न पाहाता अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेण्याचा आदेश उर्जामंत्र्यांनी दिला. देऊरवाडीचे किसन ठाकरे, बी. पी. पेंदोर, पी. के. इंगळे, दारव्हाचे गुणवंत गुल्हाने, महागावचे डी. के. नाईक, यवतमाळचे अजाब तंबाखे, अंबोडाचे आनंदराव पतंगराव, पुसदचे भरत पाटील, यवतमाळच्या मधुबन सोसायटीतील कल्पना तारे, महागावचे पंडितराव देशमुख, आर्णीचे दत्तात्रय देशमुख, सुकळीचे वैकुंठ मुंडे, दिलीप मडावी, शोभा बोबडे, नरेंद्र बोबडे, किशोर माळी, तळणीच्या नलिनी वाघमारे, श्यामराव कवाने, वडगावचे वाल्मिक पुनवटकर, नेरचे रमेश देशमुख आदींनी कृषी जोडण्या आणि घरगुती जोडण्यांच्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या. तर मुळावा येथील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी मरसूळ येथील उपकेंद्राची सुरूवात करण्याची मागणी केली. शिवसेनेतर्फे दारव्हा येथे महावितरणचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मनसेतर्फे विविध कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करण्यात आली. अविनाश उधनकर या तरुणाला २००९ पासून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी टाळाटाळ सुरू असल्याची बाब पुढे येताच उर्जामंत्र्यांनी त्याचे कागदपत्र मागवून तत्काळ नोकरीचा प्रश्न सोडविला. या शिवाय, विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे बापू दर्यापूरकर, नांझा ग्रांपचायत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, वीज तारतंत्री संघटना आदींच्याही तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच महावितरणचे अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याच्या दोन निनावी तक्रारीही उर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचल्या.यावेळी महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे, महापारेषणचे प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण, महावितरणचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, पारेषणचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत, अधीक्षक अभियंता विजय भटकर, अनिल वाकोडे, अविनाश कसबेकर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)वीज अभियंत्यांना धरले मंत्र्यांनी धारेवर जनता दरबारातील तक्रारींचा खच पाहून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या सर्व तक्रारींची निट वर्गवारी करा. येत्या १५ दिवसांत त्या सोडवा. तसेच जी कामे झाली, असे अधिकाऱ्यांनी दरबारात सांगितले, त्या कामांचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवा, असे आदेश ना. बावनकुळे यांनी दिले. जिल्ह्यातील कामांची तपासणी करण्यासाठी ‘स्पेशल व्हिजिलन्स’ येणार असल्याचेही ते म्हणाले. ट्रान्सफार्मर बदलताना ते नेण्या-आणण्याचा खर्च शेतकऱ्यांकडून घेऊ नका, शेतातील पोल सरळ करण्यासाठी ५ कोटींचा प्रस्ताव द्या, कॅपॅसिटर बँक तयार करा, जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तीन दिवसात द्या, अशा आदेशांची सरबत्ती करून उर्जामंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.एक्साईज अधिकाऱ्यांनो ! हप्तेखोरी बंद करा, अन्यथा नोकरी सोडाराज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातही जनता दरबार घेतला. जिल्ह्यातल बहुतांश दारू विक्रेत्यांनी यावेळी आपली दुकाने वाचविण्यासाठी निवेदने दिली. ही निवेदने त्या-त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे देऊन काही मार्ग निघेल का, याचा अंदाज घेण्यात येणार असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. तसेच आता गावागावातील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्कचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अजूनही लिफाफे पद्धत सुरूच ठेवली आहे. आता ही हप्तेखोरी बंद न झाल्यास नोकरी सोडावी लागेल, असा इशाराही ना. बावनकुळे यांनी दिला. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर उपस्थित होते.मुख्यालयी न राहिल्यास घरभाडे भत्ता बंद करणार अंजी नृ. येथील शेतकऱ्यांनी लाईनमन, अभियंता मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर उर्जामंत्र्यांनी घाटंजी येथील वीज कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तेथील शाखा अभियंता, उपअभियंता मुख्यालयी राहात नसतील तर त्यांचा एचआरए बंद करा, असा आदेश दिला. त्याचवेळी जेई गोलाईत यांच्या तीन तर जेई गजभिये यांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आदेशही उर्जामंत्र्यांनी दिले.